परिचारक-भालके-आवताडे -काळुंगे यांची कार्यकर्त्यांवर भिस्त
तर शिवसेनेकडून शैलाताई गोडसे आणि
काँग्रेसकडूनह नितीन नागणे यांची मोर्चेबांधणी
पंढरपूर (भगवान वानखेडे):- पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातुन भाजपाकडून उमेदवारी मिळावी म्हणुन दोन आजी-माजी आमदारांमध्ये रंगलेल्या कलगीतुर्याची चर्चा दोन्ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या पारावर आणि शहरातील चौकाचौकात सुरु आहे. माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, आमदार भारत भालके यांच्यासोबतच दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे हे तिघेही भाजपाकडून निवडणुक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपाने नाकारले तिघांची अपक्ष म्हणुन लढायचीही तयारी आहे. धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनीही काँग्रेसकडून उमेदवारी नाही मिळाली तर अपक्ष लढण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे. या सर्व नेत्यांचे मुख्य शक्तीस्थान आहे ते या सर्वांनी निर्माण केलेली कार्यकर्त्यांची मजबुत फळी. पक्ष कोणताही असो कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आपण निवडुन येवु शकतो! असा ठाम आत्मविश्वास या नेत्यांना आहे. या चारही नेत्यांच्या कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान जमलेली कार्यकर्त्यांची गर्दी आणि कार्यकर्त्यांनी ‘तुम्ही लढा, आम्ही सोबत आहोत!’ असा पुकारलेला नारा पाहता पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात पक्षापेक्षा ‘नेते’ महत्वाचे! असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. या तिघांच्यामध्ये मात्र अपवाद ठरले आहेत ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे आणि शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या जि.प.सदस्या सौ. शैलाताई गोडसे हे दोघेजण. नितीन नागणे हे काँग्र्रेकडून उमेदवारी मिळाली तर निवडणुक रिंगणात उतरणार आहेत तर सौ. शैलाताई गोडसे यांनी शिवसेनकडून उमेदवारी मिळणारंच असे गृहीत धरुन जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातुन विधानसभा निवडणुक लढण्यासाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत. यामध्ये माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी सुध्दा ही निवडणुक लढवावी असा रिचारक गटाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. खुद्द सुधाकरपंत परिचारक यांनीही ‘भाजपाने तिकीट नाही दिले तर अपक्ष लढणार’ असे घोषीत केले आहे. आमदार भारत भालके हे भाजपाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा रंगलेली आहे. पण ऐनवेळी भालके कोणता पत्ता बाहेर काढतील याचा नेम नाही. जि.प. सदस्या शैलाताई गोडसे यांनी तरशिवसेनेकडुन आपणास तिकीट मिळणारच; असे गृहीत धरुन गेल्या अनेक वर्षापासुन विधानसभेसाठीची जोरदार तयारी केलेली असुन पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात दांडगा जनसंपर्क ठेवलेला आहे. दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांनी सुध्दा पंढरपूरशी जवळीक साधत येथे जनसंपर्क कार्यालय उघडुन अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवले आहेत. मंगळवेढ्यातही ते सतत जनतेच्या संपर्कात आहेत. युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी काँग्रेस कडून लढण्यासाठी कंबर कसली आहे. तर मंगळवेढा येथील धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनीही विधानसभेसाठीची जय्यत तयारी केलेली आहे.
कार्यकर्त्यांसोबतच सर्वसामान्य जनतेला सुध्दा उत्सुकता लागुन राहिली आहे की, सेना-भाजपा युतीकडून नेमकी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची जागा भाजपाला सुटणार की सेनेला? ही जागा जर शिवसेनेला सुटली तर सौ.शैलाताई गोडसे यांना 100% उमेदवारी मिळणार असे गृहीत धरले जात आहे; परंतु जर भाजपाला ही जागा सुटली तर भाजपाकडून लढण्यासाठी इच्छुक असलेल्या कोणत्या नेत्याला उमेदवारी मिळणार? आमदार प्रशांत परिचारक यांच्या रुपाने परिचारक घराण्यात एक आमदार असताना पुन्हा भाजपाकडून या घराण्यात आमदारकीसाठीचे तिकीट दिले जाईल याची शक्यता धुसरच असल्याचे समजले जाते तर आमदार भारत भालके यांचा भाजपा प्रवेश अजुन झालेला नाही परंतु जर आमदार भालके यांनी भाजपात प्रवेश केला तर नक्कीच भाजपाकडून तिकीट मिळण्याची त्यांना 100% खात्री झाली! असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. समाधान आवताडे यांना भाजपाकडून तिकीट मिळण्याची आशा आहे. परंतु ऐनवेळी समाधान आवताडे आणि भारत भालके हे अपक्षाच्या झेंड्याखाली निवडणुक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे.
परिचारक व गोडसे यांचा निर्णय भाजपा-सेनेच्या उमेदवारीसाठी खुप महत्वाचा ठरणार आहे. परिचारक यांना भाजपा कडुन तिकीट नाही मिळाले तर भाजपाकडून मंत्रीपदासारखी मोठी संधी देण्याचं आश्वासन दिलं जावु शकतं. आणि जि.प. सदस्या सौ.शैलाताई गोडसे यांनाही सेनेकडून उमेदवारी नाही मिळाली तर एखादं महामंडळ देण्याचं आश्वासन सेनेकडून दिलं जावु शकतंं असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. असे जर घडले तर पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातुन भालके-आवताडे-काळुंगे-नागणे असा चौरंगी सामना रंगु शकतो. परिचारक आणि गोडसे यांनी माघार नाहीच घेतली तर मात्र ही निवडणुक विविध रंगी होणार हे नक्की.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments