कवितेमुळे क्रांती आणि समतेची ज्योत प्रज्वलित राहते
:- रवि वसंत सोनार
पंढरपूर (प्रतिनिधी) :- “ प्रेरणादायी आणि प्रबोधनात्मक कविता सामाजिक क्रांती आणि समतेची ज्योत प्रज्वलित करण्याचे कार्य करत असते. शिवाय प्रज्वलित केलेली ज्योत निरंतर तेवत ठेवण्याचे महनीय कार्यही कविता करत असते. "असे मत येथील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स होल्डर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते येथील समीक्षा पब्लिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या “ आभाळाला पंख हजार ” या कवयित्री राजश्री प्रकाश पाटील लिखित काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रकाशक प्रवीण भाकरे, कवयित्री राजश्री पाटील, समाजसेविका व कवयित्री शर्मिलाताई देशपांडे आणि कवी सचिन कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभलेल्या प्रकाशन समारंभात पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले “ चिंतनातून आणि निरिक्षणातून रचलेल्या वैविध्यपूर्ण कविता समाजासाठी निश्चितच दीपस्तंभासम असतात.”
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
याप्रसंगी उद्योगपती नागनाथ ताठे - देशमुख, क्रेडाई पंढरपूरचे मुकुंद कर्वे, मिलिंद देशपांडे मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रकाशन संपन्न झाल्यानंतर कवयित्री राजश्री पाटील यांनी त्यांच्या काव्यसंग्रहाचा लेखन प्रवास साहित्य रसिकांसमोर थोडक्यात मांडला. “ आभाळाला पंख हजार ” या कवयित्री राजश्री पाटील लिखित काव्यसंग्रहाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी महाराष्ट्रातील आनंद पेंढारकर - डोंबिवली, प्रशांत पोरे - पुणे, सुधाकर इनामदार- आटपाडी, कालिदास चवडेकर - सोलापूर, विश्वास कुलकर्णी- कोल्हापूर, दास पाटील - तुळजापूर, एजाज शेख - भुसावळ, विशाल राजगुरु - वाशी हे मान्यवर गझलकार तर पंढरपूर येथील उद्योगपती नागनाथ ताठे - देशमुख, क्रेडाई पंढरपूरचे मुकुंद कर्वे, मिलिंद देशपांडे, प्रा. शिवाजीराव बागल, राजेंद्र झुंबर भोसले,
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
दादासाहेब खरात, सुजीतकुमार कांबळे, राधेश बादले - पाटील, जितेंद्र शहाणे, मुरलेंद्र शेटे, प्रताप चव्हाण, आबासाहेब देशमुख, संतोष शिरगिरे, अंकुश गाजरे, गणेश गायकवाड, सुर्याजी भोसले, उमेश सासवडकर, मानसीताई केसकर, शितलताई गाजरे, ऋतुजाताई शहा, प्रज्ञाताई बडवे, शोभाताई माळवे, शुभांगीताई गाजरे, मनीषाताई कुलकर्णी, सविता सोनार, रेखाताई चंद्रराव, वर्षाताई शहाणे, भाग्यश्रीताई लिहिणे, वैशालीताई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर पुस्तक प्रकाशन समारंभाचे सुश्राव्य आणि सुमधूर असे सुत्रसंचलन सविताताई दुधभाते यांनी केले. तर प्रास्ताविक व आभार समीक्षा पब्लिकेशनचे सर्वेसर्वा प्रवीण भाकरे यांनी व्यक्त केले. सदर प्रकाशन समारंभ यशस्वी करण्यासाठी राजेंद्र झुंबर भोसले, दादासाहेब खरात, सुजीतकुमार कांबळे, आसिफ तांबोळी, ओंकार सोनार आदींनी विशेष परिश्रम घेतले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments