पंढरपूर 18 :- तनाळी-गुंजेगांव येथील माणनदीवरील पुल होणेसाठी तेथील स्थानिक नागरिकांनी आमदार प्रशांत परिचारक यांचेकडे निवेदनाद्बारे मागणी केलेली होती. त्याअनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांनी माण नदीवरील पुलास निधी मिळणेसाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून नाबार्ड या योजनेअंतर्गत रक्कम रू.7 कोटी 50 लाखाचा निधी उलपब्ध करून दिला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
यावेळी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की, तनाळी- गुंजेगांव येथील माण नदीवरील पुलाची सन 2009 साली भुमिपुजन झालेले होते. परंतु सदरच्या पुलासाठी निधी उपलब्ध नसल्यामुळे पुलाचे कामच रद्द झाले होते. परंतु पंढपूर- मंगळवेढा या दोन्ही तालुक्याला जोडणारा माण नदीवरील पुल असल्यामुळे दळणवळणाच्यादृष्टीने हा पुल होणे गरजेचे होते. त्याअनुषंगाने या पुलाच्या कामासाठी सन 2015-16 सालामध्ये मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचेकडे तनाळी- गुंजेगांव येथील माण नदीवरील पुल बांधणेसाठी निधी उपलब्ध होण्यासाठी मागणी केली होती. या मागणीचा विचार करून मुख्यमंत्री मा.देवेंद्र फड।सीं;णवीस यांनी या माण नदीवरील पुलाच्या कामासाठी रू.7 कोटी 50 लाख इतका निधी मंजूर केला. होता. सदरचा निधी मिळाल्यामुळे या पुलाचे काम पुर्ण झालेले आहे. या पुलाचे काम पुर्ण झाल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील कासेगांव-तनाळी-खर्डी-तपकिरी शेटफळ तसेच मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगांव-आंधळगांव-मारापूर-लक्ष्मी दहिवडी-पाटखळ आदी गावांना दळणवळणाच्या कामासाठी फायदा होणार असल्यामुळे तेथील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यावेळी पं.स.सभापती राजेंद्र पाटील, प.स.सदस्य प्रशांतभैय्या देशमुख, आबासाहेब देशमुख, सुरेश आगावणे, जि.प.सदस्य रामदास ढोणे, प.स.सदस्य दादा मोटे, खर्डीचे सरपंच रमेश हाके, गुंजेगावचे सरपंच रावसाहेब मेटकरी, दत्ता भाकरे, दिगंबर भाकरे, बाळासाहेब चौगुले, रावसाहेब चौगुले, शिवाजी नागणे, ताय्यप्पा गरंडे, रेवण जुंदळे, तनाळीचे सरपंच प्रकाश कांबळे, महादेव मासाळ, विजय श्रीराम,तुकाराम काळुंखे आदी विविध गावातील प्रतिष्ठित नागरिक व
ग्रामस्थ उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments