पंढरपूर (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने एप्रिल-मे २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या एम. टेक.परीक्षेमध्ये कोर्टी ता. पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील प्रशांत माळी या विद्यार्थ्याने विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी-पंढरपूर महाविद्यालयाने अभियांत्रिकी शिक्षणात अल्पावधीतच नावलौकिक संपादित केला आहे. विद्यार्थ्यांची कला ओळखुन शिक्षण देणा-या संस्थेतुन आज हजारो विद्यार्थी मोठ-मोठ्या जगातील नामांकित कंपनीत नोकरी करीत आहेत. पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणप्रणाली मुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची सिंहगडला पसंती आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी एम. टेक. परीक्षेमध्ये विद्यापीठामध्ये प्रथम क्रमांक प्रशांत माळी ९.१८ एस. जी. पी. ए., द्वितीय क्रमांक प्रतिक कुलकर्णी ९.०२ एस. जी. पी. ए., पाचवा क्रमांक सुबोध साळुंखे ८.६९ आणि सहावा क्रमांक ८.५६ एस. जी. पी. ए. मिळविले आहेत.
यशस्वी विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, अकॅड्मिक डीन डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. नामदेव सावंत, प्रा. श्रीनिवास गंजेवार, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. श्याम कुलकर्णी, प्रा. अनिल निकम, प्रा. सुधा सुरवसे, प्रा.नामदेव सावंत सह आदी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments