राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कमी झालेला जनाधार पहाता काँग्रेसचे पंढरपूरचे आमदार भारत भालके काँग्रेसचा हात सोडण्याच्या तयारीत आहेत. आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत जनताच हाच माझा पक्ष असेल असे स्पष्ट करत काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले. दरम्यान भाजपच्या वाटेवर असलेल्या भालकेंना अजून ही पक्ष प्रवेशाचा ग्रीन सिग्नल मिळत नसल्याने त्यांनी अपक्ष लढण्याची ही तयारी सुरू केली आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार भारत भालके हे मागील काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार भालके यांनी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवावी याचा निर्णय घेण्यासाठी आज मंगळवेढा मध्ये आपल्या कार्यकर्त्यांची समर्थकांची बैठक बोलावली होती. यावेळी ते बोलत होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या बैठकीत मनोगत व्यक्त करताना कार्यकर्त्यांनी कोणत्याही पक्षात जाण्या संदर्भात आमदार भालके यांना सूचना केली नाही. मात्र आमदार भालके हाच आपला पक्ष असेल असे म्हणत भालके घेईल त्या निर्णय सोबत आपण असल्याचं त्यांच्या समर्थकांनी सांगितले. आमदार भालके यांना कार्यक्रमानंतर काय निर्णय झाला याबाबत विचारले असता जनता सांगेल तोच माझा निर्णय असेल, हे जनता ठरवेल तोच माझा पक्ष आहे. असं म्हणत त्यांनी अद्याप आपण कोणत्या पक्षात जाणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यामुळे भालके काँग्रेसचा हात सोडणार हे जवळपास निश्चत मानले जात आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments