पंढरपूर सिंहगडचे सौरभ मोहोळकर, शुभम जोशी यांना रौप्य पदक गुजरात मध्ये होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड


पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडूंसाठी "राज्यस्तरीय स्टुडंट ऑलिम्पिक स्टेट गेम" यांच्या वतीने  आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ऑलिम्पिक स्पर्धेत सौरभ मोहोळकर व शुभम जोशी या दोन विद्यार्थ्यांना रौप्य पदक प्राप्त केले असुन राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.



    कोर्टी (ता. मंगळवेढा) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातुन अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले सौरभ प्रसन्न मोहोळकर व चालु शैक्षणिक वर्षात मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात द्वितीय वर्षात अभियांत्रिकी चे शिक्षण घेत असलेले शुभम गजेंद्र जोशी या दोन विद्यार्थ्यांनी "राज्यस्तरीय स्टुडंट ऑलिम्पिक स्टेट गेम" यांच्या वतीने पिंपरी चिंचवड पुणे येथील स्वामी विवेकानंद क्रिंडा संकुल मध्ये २७ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य पदक  प्राप्त केले आहे. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातील महाविद्यालयातील ४०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. बॅडमिंटन स्पर्धेत सौरभ मोहोळकर व शुभम जोशी यांनी रौप्य पदक पटकाविल्या बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.



    पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आवड असलेल्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात या स्पर्धेतुन विद्यार्थ्यांना चांगली प्रेरणा मिळावी हा मुख्य हेतु सिंहगड महाविद्यालयाचा आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच खेळामध्ये आपले करिअर करण्यासाठी महाविद्यालय विविध स्तरावर प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थी आज क्रिडा क्षेञात ही यशस्वी होत आहेत.



      बॅडमिंटन स्पर्धेत रौप्य यश मिळविले सौरभ मोहोळकर व शुभम जोशी यांची गुजरात मधील गोंधरा शहरात होणा-या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments