मी लोकांच्या अंतःकरणात- भारत भालके


पंढरपूर Live - सर्वसामान्यांच्या दु:खात मी नेहमीच सामील होत असतो. त्यांच्या हाकेला सदैव धावून जात असतो. त्यामुळे लोकांच्या अंतःकरणात मी बसलो आहे. मी हणूमानाचा भक्त आहे. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नका. अगोदर शहरातील मतपेट्या उघडा मग पूढचा निकाल पहा. ज्यांची तोंड खराब आहेत. त्यांनी माझ्यावर आरोप करू नये, असे सांगत फक्त शहरातल्या ड्रेनेजच्या कामातील भ्रष्टाचाराचे उत्तर शिवतिर्थावर द्या असे आवाहन भारत भालके यांनी केले आहे.


लक्ष्मी टाकळी ता. पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीच्या मित्र पक्षांचे उमेदवार भारत भालके यांनी कॉर्नर सभा घेतली. त्याप्रसंगी सरपंच नुतन रसाळे, मेजर मोहन देठे, अ‍ॅड. राजेश भादुले, संदिप मांडवे, सोहम घाडगे, नगरसेवक महादेव भालेराव, महादेव धोत्रे, सुधाकर भोसले, सागर यादव, श्रीकांत शिंदे, समाधान फाटे, मनसेचे शशिकांत पाटील, दिपक येळे, संजय भिंगे आदी उपस्थित होते.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________

यावेळी बोलताना भालके म्हणाले की, सन 2011 मध्ये नगरपालिका माझ्या ताब्यात आल्यानंतर शहरामध्ये अनेक विकासकामे केली. परंतू काही जणांनी फोडाफोडीचे राजकारण केले. गोरगरीबांच्या जमिनीवर आरक्षण टाकून स्वतःची संपत्ती काही जणांनी वाढविली. परंतू मी माणसे कमविण्याचे काम केले आहे. शहरातील गुंडा गर्दी व अनेक समस्यांबाबत मी विधानसभेत आवाज उठविला. परंतू विरोधकांनी केवळ आपआपसामध्ये भांडणे लावून काट्याने काटा काढण्याचे काम केले आहे. शहरामध्ये 1 कोटी झाडे लावण्याचे काम केले असेल तर कुठे झाडे लावली ते दाखवा? शहरामध्ये मी राष्ट्रीय पुरूषांची अनेक स्मारके उभा केली. 

परंतू सावित्रीला त्रास देणार्‍या मंडळींनी महापुरूषांच्या स्मारकाला जागा सुध्दा दिली नाही. ही निवडणूक विधानसभेची आहे. तरीपण यांनी सैनिकांचा अपमान केला तेच माझ्या शरिरावर टिका करीत आहे. परंतू माझ्या किडण्यांचे मी बघतो तुम्ही अगोदर तुमचे रक्त तपासा असे सांगत भारत भालके यांनी शहरात झालेल्या भ्रष्ट कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. याप्रसंगी समाधान फाटे, सागर यादव, संदिप मांडवे, सुमित शिंदे, अ‍ॅड राजेश भादुले आदींनी आपले मनागेत व्यक्त केले. मंगळवेढ्यात 16 प्रचार सभा पार पडल्यानंतर भारत भालके यांनी पंढरपूर शहरामध्ये नागालँड चौक, महावीर नगर, कालिकादेवी चौक, लक्ष्मी टाकळी या भागात कॉर्नर सभा घेतल्या.

_________________________________________________
_________________________________________________
उपनगरामध्ये कोट्यावधींची विकास कामे आ. भारत भालके यांनी केली आहे. न्यायालयीन अडचणीमुळे जेंव्हा टाकळी रस्ता बंद झाला तेंव्हा सर्वात अगोदर आ. भारत भालके धावून आले. नगरपालिकेची बिल्डिींग 2 कोटी 24 लाखाला अर्बन बँकेकडे गहाण ठेवून घेणार्‍यांना विकास कुठे व कोणत्या कोणत्या भागात झाला आहे हे मी पुराव्यासहित सांगू शकतो. - संदिप मांडवे, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँगे्रस    
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments