पंढरपूर Live :- दि.17 राज्यातील नाकर्त्या सरकारमुळे 16 हजार शेतकर्यांनी आत्महत्या केेलेल्या असून निवडणूकांच्या काळातही शेतकरी आत्महत्या करत आहे. त्यामुळे कोणत्या तोंडाने मतांचा जोगवा मागताय हेच कळेनासे झाले आहे. कारण सरसकट कर्जमाफी कुणालाही मिळाली नाही. आमच्या शेतकर्याकडे 3.50 लाख असतील तर आम्ही दिडलाखाची माफी मागितलीच नसती. कर्जमाफी कशी द्यायची ते माझ्या काकांना विचारा कारण 2 टक्के व्याजदराने आम्ही कर्जपुरवठा केला आहे. परंतू बँकांची वाट लावून काही जितराबं आज पलीकडे गेली आहेत. असे सांगत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत भाजप सरकारचा चांगलाच समाचार घेतला. पाच वर्षात शेतकरी, महिला, तरूण यांच्यासह सर्व सामान्यांची फसवणूक करणार्या फसणवीस सरकारला जागा दाखविण्याची वेळ आली आहे.
मंगळवेढा येथे राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रचार सभा झाली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे लतीब तांबोळी, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, राजूबापू पाटील, युवराज पाटील, मनसेचे सहकार सेना प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा अनिता नागणे, राजाभाऊ निकम, समाधान फाटे, विलास चेळेकर, चंद्रकांत दुबले, राजेंद्र हजारे, पी.बी.पाटील, नितीन नकाते, सुवर्णा बागल, भारत बेद्रे, रामचंद्र वाकडे, लक्ष्मण पवार, विजयसिंह देशमुख, चंद्रकांत घुले, विजय खवतोडे, संदीप मांडवे, सुभाष भोसले, शशिकांत पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
याप्रसंगी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ही निवडणूक राज्याची आहे. त्यामुळे 370 चा काहीही संबंध नाही. पवारसाहेबांसह आम्ही सर्वांनी 370 चे स्वागत केले आहे. आमचे 15 वर्षे व यांच्या 5 वर्षाची तुलना करा. पाच वर्षात शेतकरी मातीत गाडला गेला आहे. कारण राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच शेतकर्यांनी संप पुकारला होता. दुष्काळात बागा वाचविण्यासाठी टँकरने पाणी देण्याचे काम पवार साहेबांनी केेले. शेतीमालाचे दर पडल्यानंतर निर्यातबंदी सारखे निर्णय घेऊन साहेबांनी शेतकर्याला मोठा आदार देण्याचे काम केले आहे. त्यामुळेच सर्व सामान्य माणूस साहेबांसोबत जोडला गेला आहे. आज नोकरभरती बंद असल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहेत. कडकनाथच्या कोंबड्या मुख्यमंत्र्यांच्या समोर का फेकल्या गेल्या याचे उत्तर सदा खोतांनी द्यावे. ज्यांनी कधी नीट झुणका भाकर दिला नाही ते आता 10 रूपयात जेवण द्यायचे सांगत आहेत. त्यामुळे पाच वर्षात हे काय झोपले होते का? पाच वर्षात व्यवस्थित वीज पुरवठा न पुरविणारे सरकार आज मात्र 12 तास वीज देण्याचे आश्वासन देत आहे. रात्रीचा दिवस करून केवळ शेतकरी व सर्व सामान्यांसाठी काम करणार्या पवार साहेबांना काही संबंध नसताना फडणवीस सरकार ईडीची नोटीस काढतेय. तीच वेळ तुमच्यावरही येणार आहे. त्यामुळे गाफील राहू नका? कारण आता म्हशीपेक्षा रेडकू मोठे झाले आहे. धरणे भरले असतानाही पाण्याची वाट लावणार्या सरकारच्या काळात फक्त अंबानी व अदानी श्रीमंत झाले आहेत. 50 हजारात शौचालयाचे खड्डे सुद्धा होत नाहीत. तरीही सरकार म्हणतेय मागेल त्याला शेततळे दिली. भोसे येथील 40 गावची पाणी योजना नियम बदलून आम्ही दिली. कारण कागद नव्हेतर आम्हाला माणूस वाचवायचा आहे. तरूण, महिला, शेतकरी व सर्व सामान्यांचा अपमान करणार्या सरकारच्या काळात चिक्की घोटाळा, तुरडाळ घोटाळा, लोकमंगल बँक घोटाळा असे अनेक घोटाळे झाले आहेत. त्यामुळे सरकारने ज्यांनाज्यांना भिती दाखविली ते पवार साहेबांना सोडून गेले. पण साहेब खचलेले नाहीत. ज्यांनी ज्यांनी साहेबांना सोडले ते तुम्हाला नक्कीच वार्यावर सोडतील. मुख्यमंत्र्यांना कुस्ती खेळायची हाऊस असेल तर कपडे काढून मैदानात या. भारतनाना आमचा पैलवान तयार आहे. ऐतिहासीक वारसा असणारे किल्ले भाड्याने देण्याचे टेंडर काढणार्या सरकारने इतिहास पुसण्याचे तयारी सुरू केलेली आहे असे सांगत अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
या सभेप्रसंगी आवताडे गटातील मुन्ना मलपे (इसबावी), कैकाडी समाज पंढरपूर यांच्यासह शिवसेनेचे दादासाहेब लाड आदी कार्यकर्त्यांनी श्री भारत भालके यांना जाहीर पाठिंबा देेत अजितदादांच्या उपस्थित राष्ट्रवादीत प्रवेश केला.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments