परिचारकांरूपी पांडुरंग विधानसभेत पाठवा- सदाभाऊ खोत




 पंढरपूर  : सुधाकरपंत परिचारकांचा आणि त्यांच्या संबधित संस्थाचा कारभार हा काचेसारखा पारदर्शी आहे. त्यामुळे असाच पारदर्शी व्यक्ती जनतेच्या विकासाकरिंता विधीमंडळात हवा आहे. त्यामुळे शेतक-यांचा दैव असणारा पंढरपूरचा पांडुरंग परत एकदा विधीमंडळात आम्हाला नक्की दिसेल. आणि हाच पांडुरंग म्हणजेच सुधाकरपंत परिचारक हेच मंगळवेढयाला पाणी आणून देउ शकतात. असा विश्वास कृषिराज्यमंत्री तथा रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभा खोत यांनी व्यक्त केले.
   

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  

_________________________________________________

(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात

नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर


मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे

💯% फरक नाहीतर पैसे परत

😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट

आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत


घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999

व्हाट्स अप नंबर: 8888959582

सोलापूर प्रतिनिधी

Mallikarjun swami

8644809999 9588488845

पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178

उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर




_________________________________________________


येथील टिळक स्मारक मंदिराच्या पटांगणामधे विजयी संकल्प मेळावा घेण्यात आला. यावेळी पंढरपूरचे महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्यासह व्यासपीठावर पालकमंत्री विजयकुमार देशमुख , राज्यमंत्री सदाभाउ खोत , माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहीते पाटील , लक्ष्मणराव ढोबळे , शिवसेनेचे जिल्हासंपर्कसहप्रमुख शिवाजी सावंत , साईनाथ अभंगराव , आ. प्रशांत परिचारक , नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.
   _________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________

प्रसंगी पुढे बोलताना खोत म्हणाले , शेतक-यांच्या तसेच सामान्यांच्या हिताचे काम करणारे परिचारक हे 25 वर्षे विधीमंडळात होते. आणि आता त्यांना पुन्हा विधीमंडळात पाठवण्याची सुवर्णसंधी येथील जनतेला मिळाली आहे. आणि या संधीचे नक्की सोने होईल. कारण राज्याच्या राजकारणात अशी काही मोजकी मंडळी आहेत. की त्यांचे चरणस्पर्श करावेत. यामधे सुधाकर परिचारकांचा समावेश आहे. असेही ते म्हणाले आहेत.
पालकमंत्री विजयकूमार देशमुख हे बोलताना म्हणाले , पंढरपूरला आणि परिचारकांना सर्वार्थाने न्याय मिळाला गेला आहे. आणि आजच्या त्यांच्या समर्थकांच्या गर्दीने ते विधीमंडळात असतील. यावर शिक्कामोर्तब होत आहे. गेल्या दहा वर्षापासून थांबलेली पंढरपूरची विकासगंगा आता पुन्हा परिचारकांच्या रूपाने वाहताना दिसेल. असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
तसेच याप्रसंगी खा. निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात म्हणाले , विरोधी उमेदवार ज्या पक्षात जातो. त्या पक्षांचे अस्तित्वच संपून टाकतो. त्यामुळे पूर्वी कॉग्रेसमधे असणारे विरोधक आता राष्ट्रवादी संपवायला निघाले आहेत. अशीही टीकाटिपणी भालकेंचे नाव घेता यावेळी करण्यात आला.
यावेळी लक्ष्मणराव ढोबळे बोलताना म्हणाले ,  स्व.औंदुबरआणा पाटील यांनी शेतक-यांसाठी सहकारांचे मंदिर हे कारखान्यांच्या रूपाने उभा केले. वाढवलं , मोठही केलं. आणि मिळवलंही. पण नाना नावांच्या लबाडांने हेच शेतक-यांचे मंदिर पळविण्यांचे काम केले आहे. त्यामुळे आता शेतक-यांनी आता सहकारांचे मंदिर पळविणा-यांच्या लबाडांच्या नादी लागू नये. असे आवाहन याप्रसंगी ढोबळे यांनी केले. यानिमित्ताने कल्याणराव काळे , लक्ष्मणराव ढोबळे , नगराध्यक्षा साधना भोसले , आ. प्रशांत परिचारक आदिंनी मनोगते व्यक्त केली.

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments