महर्षी वाल्मिकी संघाचा सुधाकरपंत परिचारक यांना पाठींबा


भाजपाच्या काळात महादेव कोळी समाजाचे अनेक प्रश्‍न मार्गी लागले
- गणेश अंकुशराव
पंढरपूर Live - समस्त महादेव कोळी समाजाच्या अनेक प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात प्रलंबीत होते, असे अनेक प्रश्‍न भाजपा शासनाच्या काळात मार्गी लागल्याने आम्ही बहुमताने भाजपास पाठींबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे उर्वरीत कामे मार्गी लावण्याचे आश्‍वासन यावेळी देण्यात आल्याने आम्ही बहुमताने भाजपाच्या पाठीशी आहोत. त्यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे भाजपाचे अधिकृत उमेदवार सुधाकरपंत परिचारक मोठ्या फरकाने निवडून येतील. असा विश्‍वास महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी व्यक्त केला. नुकताच त्यांनी महर्षी वाल्मिकी संघाचा पाठींबा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना जाहीर केला.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
जातीच्या दाखल्यासह सध्या नोकरीस असणार्‍या कर्मचार्‍यांच्या बाबतीत तसेच विविध योजनांच्या बाबतीत जी आश्‍वासने राष्ट्रवादी शासनाने दिलेली होती ती त्यांच्या काळात पाळली गेली नाही. राष्ट्रवादीच्या काळात हजारो महादेव कोळी समाजाचे कर्मचारी कामावरुन कमी करण्यात आले. अनेकांनी दहा ते बारा वर्षे नोकरी केलेली होती, असे अनेक कर्मचारी कामावरुन काढल्याने त्यांचे संसार उध्दवस्त झाले. अनेकांना नोकरी सोडून मजुरी कामावर जाण्याची वेळ राष्ट्रवादी सरकारने आणली. त्यावेळी विरोधी पक्षात असणारे व सध्याचे मुख्यमंत्री यांनी भाजपा सरकार आल्यानंतर एकाही कर्मचार्‍यास कामावरुन कमी केले जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्याप्रमाणे फडणवीस सरकारने एकाही कर्मचार्‍यास नोकरीवरुन काढले नाही अथवा एकासही साधी नोटीसही बजावली नाही, हे मोठे काम भाजपाच्या काळात झाले. तसेच आमची जातीच्या दाखल्यांची मागणी होती ती तत्वत: मंजूर झालेली असुन त्यानुसार या काळात 200 पेक्षा जास्त जणांना जातीचे दाखले मिळालेले असून प्रलंबीत असलेले दाखलेही मंजूर करणार असल्याचे सांगितले आहे.

यामुळे प्रलंबीत असणारे सर्व प्रश्‍न भारतीय जनता पार्टीच्या काळात मार्गी लागणार असल्याने समाजातील सर्व बांधवांनी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर रामचंद्र परिचारक यांना भरघोष मतांनी निवडून देण्याचे आवाहन गणेश अंकुशराव यांनी केले. पाठींबा जाहीर केल्याबद्दल युटोपियन शूगर्स चे चेअरमन उमेश परिचारक यांनी महर्षी वाल्मिकी संघाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीरभाऊ अभंगराव,  राहुल परचंडे, संपत सर्जे,जयवंत अभंगराव, विनायक संगीतराव, संजय करकमकर, नवनाथ करकमकर, वैभव कांबळे, रामभाऊ सुरवसे, प्रकाश मगर, विकी संगीतराव, विकी अभंगराव, श्रीकांत बळवतकर, अभय अंकुशराव आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.   



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments