भाजपा-शिवसेना महायुती सरकारच्या काळात मागासवर्गीयांच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या आहेत. शासकीय योजना अंमलात आणायला पुर्वी शिफारस पत्र लागायचे, महायुतीच्या काळात दलाल-शिफारस लागत नाही, त्यामुळे तालुक्याच्या विकासासाठी विरोधकांवर हात उगारण्या पेक्षा मत उगारा व परिचारकांसारखा कामाचा माणूस निवडुन विधानसभेवर पाठवावा, असे आवाहन मा.पालकमंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले.
महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचार यांच्या प्रचारार्थ आंधळगाव येथील सभा झाली. यावेळी रयत क्रांतीचे राज्याचे नेते दीपक भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते माऊली हळवणकर, दामाजी कारखान्याचे मा.चेअरमन चरणूकाका पाटील, माजी सभापती शिवानंद पाटील, दिनकरभाऊ मोरे, माऊली हळणवर, रासप तालुकाध्यक्ष आबा मेटकरी, इन्नुसभाई शेख, नाना वाघमारे, वामनराव माने, दाजी पाटील आदी कार्यकर्ते मोठय़ा संखेने उपस्थित होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
लक्ष्मनराव ढोबळे म्हणाले, पाणी व्यवस्थापन, हजारो किलोमीटर रस्ते, सर्वसोयीनी युक्त रेल्वे व बसस्थानके यांचे काळात झाली आहेत. नदी जोड प्रकल्प, कृष्णा भीमा स्थिरीकरण अशा अनेक योजना महायुती आपले साठी घेऊन येत आहेत. मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावे गेल्या अनेक वर्षापासून तहानलेली आहेत त्यांना पाणी देण्यासाठी आणि या भागाचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना व मित्र पक्ष या महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना निवडून देण्याची गरज आहे. मागील दहा वर्षांमध्ये आपण ज्या लबाड आमदारावर विश्वास ठेवून विश्वास ठेवून निवडून दिलं त्याला आता आपण आमच्यासाठी काय दिलं हे विचारण्याची वेळ आलेली आहे.
यावेळी बोलताना सुधाकर परिचारक म्हणाले, भाजपा-शिवसेना महायुतीच्या काळात आपले तालुक्याचा जास्तीत जास्त विकास करणेची जबाबदारी माझी राहणार आहे. या शासनाने आजवर अनेक लोकउपयोगी योजना दिल्या आहेत. या भागातील पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री यांचेकडून कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे काम आम्ही करणार आहोत. यासाठी विधानसभेवर सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून मला सेवा करणेची संधी मंगळवेढेकरांनी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी मा.खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे मध्यस्थीने धनगर समाजाचे श्वास असणारे तानाजी खरात मुढवी, तसेच मल्लेवाडी येथील उपसरपंच चंद्रकांत गोडसे यांनी आपले कार्यकर्त्यासमवेत परिचारक यांना पाठिंबा जाहीर केला. गतनिवडणुकीचे उमेदवार असणारे दक्षिण पश्चिम भागातील सिंचनापासून वंचित असणाया म्हैसाळ योजनेसह 46 गावाला पाणी मिळवून देण्यासाठी सुधाकरपंत परिचारक हे सक्षम असलेने केंद्रा बरोबर राज्यातील सत्ताधायाचे पाठबळ असावे म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते यांनी पाठिंबा दिला असल्याचे दामाजी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व माजी सभापती अँड.नंदकुमार पवार यांनी सांगितले.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________







0 Comments