मंगळवेढ्याच्या सर्वांगीन विकासासाठी सुधाकर परिचारक यांना निवडून द्या- ना.लक्ष्मण साऊदी

Pandharpur Live- पंढरपूर मंगळवेढा भाजपाचे उमेदवार म्हणून ब्रह्मचारी असणार्‍या परिचारिकांना संधी देण्यात आली आहे.  ब्रह्मचारी संन्यासी माणसाला मत देणे किंवा त्याचे आशीर्वाद घेणे हे मोठे भाग्याचे लक्षण असते आणि आपले महान असं त्याला मत देण्याचे भाग्य पंढरपुर मंगळवेढ्यातील जनतेला मिळते आहे. यासारखी सौभाग्याची दुसरी बाब नाही. असे प्रतिपादन कर्नाटक सरकारचे उपमुख्यमंत्री ना.लक्ष्मण साऊदी यांनी केले.

मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती या ठिकाणी महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलत होते. प्रसंगी आमदार प्रशांत परिचारक, नितीन पाटील, चरणुकाका पाटील, धनंजय जाधव, किसान बेद्रे, लेंडवे, अप्पासाहेब जाधव, औदुंबर वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री साऊदी म्हणाले संन्यासी तसेच ब्रह्मचारी मनुष्य हा त्याच्या वैयक्तिक सुखाचा त्याग करत असतो. तो शेवटपर्यंत केवळ जनसेवेसाठी आपले जीवन व्यतीत करत असतो. असेच येथील उमेदवार सुधाकर परिचारक आहेत. सध्या केंद्रात व कर्नाटकात भाजपाचे सरकार आहे. महाराष्ट्रातही भाजपाचे फडणवीस सरकार आगामी काळात पुन्हा येणार आहे. अशावेळी पंढरपूर मंगळवेढ्याचा विकास झाला पाहिजे, याकरिता भाजपाचे आमदार म्हणून परिचारक हे विधानसभेत जाऊन पोहोचले पाहिजेत. असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
💯% फरक नाहीतर पैसे परत
😍आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेट
आठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
-सोलापूर प्रतिनिधी-
Mallikarjun swami
8644809999 9588488845
-पंढरपूर प्रतिनिधी-
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
-उत्पादक-
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर

_________________________________________________

मंगळवेढा नगरीतील जनतेसाठी भाजपा सरकार मंगळवेढ्यात बसवेश्वरांचे स्मारक उभारणार आहे. त्यासाठी दीडशे कोटी रुपये देखील निधी मंजूर करण्यात आला आहे. बसवण्णा यांच्या स्मृती आणि त्यांचा विचार त्यांचे संस्कार भाजपा संपूर्णपणे अंगीकारत आहे. त्यामुळे या भागातील जनतेने भाजपाला मत देऊन या ठिकाणी सरकार आणावयाचे आहे. बसवेश्वर स्मारकाचे काम मार्गी लावायचे आहे. असेही ते यावेळी म्हणाले. 

केंद्रात महायुतीचे सरकार येणार आहे. राज्यात भाजपा शिवसेना महायुतीची सत्ता येणार आहे. अशा वेळी अशा निष्क्रिय लोकप्रतिनिधीला निवडून काय उपयोग असा सवालही त्यांनी यावेळी केला. प्रत्येक वेळी लबाड, नाटकी बोलून फसवणारे, कारखान्याचा काटा मारून बिले काढणारे, एकदा साड्या वाटल्या त्याची बिले पण कारखान्यात नावे टाकणारे आमदाराला यावेळी नक्की धडा शिकवा. असा घणाघात आरोप आ.प्रशांत परिचारक यांनी केला. 

_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
 भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
 * बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्‍वर गायकवाड. 9921783909

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments