पंढरपूर (प्रतिनिधी) रोटरी क्लब ऑफ पंढरपूर ही सेवा भावी संघटना १९३७ पासुन पंढरपूर शहरात कार्यरत असुन अनेक सामाजिक उपक्रम रोटरी क्लब कडून राबविले जातात.त्याचाच एक भाग म्हणून व अलिकडच्या काळात वाढते अपघात लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ पंढरपूर यांनी नागरीकांसाठी वाहतूक सुरक्षा नियमावली या पुस्तकाचे प्रकाशन पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात डी. वाय. एस. पी. सागर कवडे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे उदघाटन पंढरपूर रोटरी क्लब चे अध्यक्ष रो. विश्वास आराध्ये, डी. वाय. एस. पी. सागर कवडे, सिंहगड काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे प्रोजेक्ट चेअरमन रो. सुरेश जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
यावेळी रोटरी क्लब चे अध्यक्ष विश्वास आराध्ये यांनी संकलन केलेल्या नागरिकांसाठी वाहतूक सुरक्षा नियमावली या पुस्तकात वाहतूक की चे नियम न पाळणा-यांसाठी कोणता गुन्हा, कोणत्या कलम नुसार दाखल होऊ शकतो त्या गुन्ह्यासाठी कायद्याने कोणती शिक्षा व दंड होऊ शकतो या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना होणार असल्याचे मत व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डी. वाय. एस. पी सागर कवडे म्हणाले की. भारत हा तरुणांचा देश आहे. या देशाची तरूण पीढी जर सशक्त असेल तर आपण जगावर राज्य करू शकेल. आज तरूणामध्ये अपघाताचे प्रमाण खुप वाढले आहे. भारताच्या सीमेवर जवानांना जेवढा धोका आहे त्याच्या कितेक पट्टी धोका हा रोड अपघाताचा आहे कारण नियमाचे पालन न केल्याचा खुप मोठा परिणाम होत आहे. अपघात झाल्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट ज्यावेळी आम्ही पाहतो त्यावेळी बरेच व्यक्तीचा मृत्यू हा डोक्याला मार किंवा इजा होऊन अपघात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वाहन चालवताना हेल्मेट वापरणे, सिटबेल्ट लावणे आज स्वतःच्या जीवासाठी खुप महत्वाचे असल्याचे मत डी वाय एस पी सागर कवडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
यावेळी डी वाय एस पी सागर कवडे, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, रो. अध्यक्ष विश्वास आराध्ये प्रोजेक्ट चेअरमन रो. सुरेश जोशी आदी मान्यवरांच्या हस्ते नागरिकांसाठी वाहतूक सुरक्षा नियमावली या पुस्तकाचे प्रकाशन करून ती पुस्तके विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सुञसंचालन डाॅ. राजश्री बाडगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रो. विनय पदमवार यांनी मानले.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________







0 Comments