Pandharpur Live- मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिलांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. या माध्यमातून देशातील महिलांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन आले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत भाजप-सेना प्रणित महायुतीला तमाम महिलांच्या वतीने मताच्या रूपाने भाऊबीज भेट देऊ. असे प्रतिपादन भाजपाच्या राज्य उपाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी केले आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मंगळवेढा येथील महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. प्रसंगी व्यासपीठावर खा.जयसिद्धेश्वर महास्वामी, सीमाताई परिचारक, अश्विनी शहा, जि.प.पशुसंवर्धन सभापती रजनी देशमुख, शिवसेना नेत्या कोमल ढोबळे, ज्योती चव्हाण, शितल बुरकुल, अंजली मोरे, नगरसेविका निर्मला माने, माजी जि.प.उपाध्यक्षा वैशाली सातपुते, शुभांगी सुर्यवंशी आदि उपस्थित होत्या. यावेळी काँग्रेसच्या माजी तालुकाध्यक्ष अंजली मोरे यांनी भाजपात प्रवेश केला.
चित्राताई वाघ पुढे म्हणाल्या, महिला ही एक कुटुंबाचा कणा म्हणून ओळखली जाते. महिलेचा सक्षमपणे विकास झाला तर निश्चितच कुटुंब व्यवस्थेचा विकास होतो. यासाठी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे याकरता भाजप सरकारने बचत गटांना आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य करत महिला विकासाकरता अनेक पावले उचलली आहेत,
सध्या महिलांमध्ये वेगवेगळ्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र या आजारावर उपाययोजना करण्याची तत्परता आज महिलांमध्ये आली पाहीजे. यासाठी जनजागृती शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊन केंद्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेले उज्वला गॅस योजना महिलांसाठी वरदान ठरली आहे. मागील पाच वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्रातील व राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने महिलांच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. या माध्यमातून देशातील महिलांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन आले आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत भाजप-सेना प्रणित महायुतीला तमाम महिलांच्या वतीने मताच्या रूपाने भाऊबीज भेट देऊ. महिलांमध्ये परिवर्तन झाले तरच सर्वार्थाने देशाची क्रांती होऊ शकेल. असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) सांधेदुखीला करा राम राम...फक्त एका महिन्यात
नवजीवन
वेदनाहर ऑइल व पावडर
मान दुखी | पाठ दुखी | कंबर दुखी | टाचदुखी | गुढगे दुखी | हातापायाला मुंग्या येणे
% फरक नाहीतर पैसे परत
आपल्या वडीलधाऱ्यांना द्या आधार पूर्व भेटआठवड्याचा कोर्स फक्त 445 रुपयांत
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999 / 9145889999
व्हाट्स अप नंबर: 8888959582
सोलापूर प्रतिनिधी
Mallikarjun swami
8644809999 9588488845
पंढरपूर प्रतिनिधी
अनिल सेजाळ
8208986840 / 9890896178
उत्पादक
नवजीवन ॲग्रो प्रोडक्टस् यशोदानगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर
_________________________________________________
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सीमा परिचारक वैशाली सातपुते कोमल ढोबळे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. तर खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांनीही या वेळी महिलांना शुभेच्छा देत सुधाकरपंत परिचारक यांना निवडून देण्याचे आवाहन केले.
प्रसंगी नगरसेवक अजित जगताप म्हणाले, भाजप सरकारने मंगळवेढा शहराच्या विकासासाठी 20 कोटी दिले आहेत. या निधीतून शहरातील विविध विकास कामे सुरू आहेत. याहीपुढे विकासाची गंगा मंगळवेढ्यात यायचं असेल तर भाजपा तथा महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांना निवडून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या महिला मेळाव्याचे सुत्रसंचालन स्वाती कोंडुभैरी तर आभार शशिकांत चव्हाण यांनी मानले.
मंगळवेढ्यात प्रथमच महिलांची न भूतो न भविष्यती अशी रॅली आज भाजपाच्या प्रचारार्थ निघाली. या रॅलीमध्ये हजारो महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सदरची महिलांची रॅली शनिवार पेठेतून चोखामेळा चौक शिवप्रेमी चौक दामाजी चौक यासह शहरातील मुख्य मार्गावरून निघाली होती. संत चोखामेळा आणि संत दामाजीपंतांना यावेळी अभिवादन देखील करण्यात आले.
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments