पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पोलीस चौकीत 'कडक पोलिस अधिकारी' म्हणुन नावाजले गेलेले पोलीस निरीक्षक विश्वास साळोखे यांना चार वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लाच घेणेप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.
तीन वर्षांपूर्वी ते मोहोळ पोलीस स्टेशनला रुजु झाले होते. येथे त्यांना लाच घेण्याच्या प्रकरणात अटक झाली होती. सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विशेष न्यायालयाने संबंधित गुन्ह्याचा आरोप सिद्ध झाल्याने हा निकाल दिला आहे.
पंढरपूर विधानसभेचे आमदार भारत भालके यांच्याशी साळोखे यांनी वाद घातलेले प्रकरण चांगलेच गाजले होते. मंदिर परिसरातील अतिक्रमणाबाबत आमदार बालके यांच्याशी झालेल्या वादामुळे विश्वास साळोखे हे चर्चेत आले होते. यावेळी काहीजणांकडून साळोखे 'कडक पोलिस अधिकारी' म्हणुन नावाजले गेले होते. तर आमदार भालके समर्थकांच्या दृष्टीने मात्र ते 'मग्रुर पोलिस अधिकारी' म्हणुन टीकेचे धनी ठरले होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलिस निरीक्षक विश्वास साळोखे याने 85 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 69 हजार रुपये घेण्याचे ठरले. पोलिस ठाण्यामध्ये 69 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पोलिस निरीक्षक साळोखे यास रंगेहात पकडले होते. ही घटना 9 जून 2016 रोजी घडली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तपास करून पोलिस निरीक्षक साळोखे याच्याविरोधात दोषारोपपत्र मे.न्यायालयात सादर केले होते. मंगळवारी या प्रकरणात मे.न्यायालय यांनी पोलिस निरीक्षक साळोखे यास चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे, अशी माहिती जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी दिली.
साळोखे हे सध्या पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पोलीस चौकीत कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी मोहोळ पोलिस ठाण्यात कार्यरत असताना लाच प्रकरणात अटक झाली होती. पंढरपुरात आमदार भारत भालके यांच्याशी झालेला वादामुळे विश्वास साळोखे हे चर्चेत आले होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977
_________________________________________________
_________________________________________________




0 Comments