Pandharpur Live - गोविंदपूर्यातील श्रीदासगणुमहाराज यांचा वाडा ‘दामोदराश्रम’ येथे प. पू. स्वामी वरदानंद भारती यांच्या प्रेरणेने सुरु झालेला, संस्कृती संरक्षण व संवर्धनाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संतकवी श्रीदासगणुमहाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ दिला जाणारा यावर्षीचा एक लक्ष रुपयांचा पुरस्कार वारकरी संप्रदायाचे मुखपत्र असलेल्या सा. पंढरी संदेशला अध्यक्षा कल्याणीताई नामजोशी यांचेहस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलनाने झाली. तद्नंतर ईशवंदन श्री. प्रभाकरमहाराज आजेगांवकर यांचे होऊन श्रीज्ञानेश्वराष्टक आणि श्रीदासगणूमहाराज प्रार्थना सामुहिक झाली.
श्रीपांडुरंगाचे आशिर्वाद श्रीसंत प्रल्हादमहाराज बडवे यांचे वंशज ह. भ. प. अनिलकाका बडवे यांनी दिले. तर श्रीरुक्मिणी मातेचे आशिर्वाद भागवताचार्य वा. ना. उत्पात यांनी दिले. श्रीदासगणूमहाराज पुरस्कारा-बाबतची भूमिका श्री. महेशमहाराज आठवले यांनी विषद केली. त्यांत त्यांनी देव, देश, धर्म, संस्कृती संरक्षण व संवर्धनाबद्दल हा पुरस्कार देण्यात येत असतो असे विषद केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश*
*फक्त एका महिन्यात*
*नवजीवन*
*लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
*♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट*
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये*
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात*
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा*
*9145449999/9145339999*
*संपर्क*
*नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट*
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________
8149624977

भागवताचार्य श्री. वा. ना. उत्पात यांनी सा. पंढरी संदेशचा परिचय करुन दिला. त्यात त्यांनी आजपर्यंत लाभलेल्या संपादक मंडळींचा, पंढरी संदेशने केलेल्या धर्मकार्याचा, अविरत सुरु असलेल्या संतसेवेचा तसेच श्री. गजाननराव बिडकर यांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.
तद्नंतर पारितोषिक वितरणात- दहावीमध्ये पुणे विभागात प्रथम आलेल्या सांगोला विद्यामंदिर येथील कु. श्रृति विवेकानंद विभूते व लातूर विभागात प्रथम आलेल्या केशवराज विद्यालयातील अभिषेक संतोष जाधव या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांची मनोगतेही झाली.
संतकवी श्रीदासगणु महाराज पुरस्कार सा. पंढरी संदेशकरिता श्री. गजाननराव बिडकर यांना प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणीताई नामजोशी यांच्याहस्ते देऊन गौरविण्यात आले. श्री. गजानन बिडकर यांनी आपले मनोगतात- ‘येथ वडिल जे जे करिती ।’ या संतोक्ती प्रमाणें माझे आजोबा धर्मभूषण गोविंद सखाराम बिडकर, पितृचरण पंढरीनाथ गोविंद बिडकर, विद्यागुरु माझे चुलते गोपाळराव बिडकर, नारायणराव बिडकर यांनी घालून दिलेल्या मार्गाने सा. पंढरी संदेशची ही सुवर्ण महोत्सवी वाटचाल सुरु असल्याचे सांगितले. या कार्यात विद्वत्र्त्न संपादक मंडळ, अभ्यासु लेखक वर्ग, वाचक, वर्गणीदार, जाहिरातदार, हितचिंतक व पंढरी संदेश परिवाराचे अनमोल सहकार्य लाभले. संतकवी श्रीदासगणु महाराज पुरस्कार दिल्याबद्दल साप्ताहिक पंढरी संदेश त्यांचा ऋणी असल्याचेही ते आपले मनोगतात म्हणाले.
समारोपीय भाषणात कल्याणीताई नामजोशी यांनी श्रीसंत दासगणुमहाराज यांच्या जन्मभूमीत हा पुरस्कार वितरण सोहळा होत असल्याचे सांगून पंढरी संदेशच्या कार्याची प्रशंसा केली. सा. पंढरी संदेशची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा सदिच्छाही दिल्या. सा. पंढरी संदेश बाबतीत आम्हाला परदेशातूनही विचारणा झाली. त्यामुळे आता सा. पंढरी संदेशने आपली वेबसाईट लवकरच प्रकाशित करावी असेही त्या म्हणाल्या. तसेच त्यांनी पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांना संस्कृत बाबत मार्गदर्शनही केले.
तद्नंतर श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांनी आपले भाषणांत पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री. गजाननराव बिडकर यांचे अभिनंदन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच आयोजकांनी पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. श्री. अरुण परळीकर यांनी यथोचित कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. माधव खिरे यांनी यथायोग्य केले. सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. •
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.8149624977
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments