उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; 'त्या' वारकरी शेतकरी दांपत्यालाही दिलं शपथविधीसाठी आमंत्रण


Pandharpur Live - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीसाठी देशभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, या सगळ्या घाईगडबडीत उद्धव ठाकरे यांनी एका वारकरी शेतकरी दांपत्यालाही आवर्जून निमंत्रण  पाठवले आहे.

काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे सांगलीच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी संजय सावंत आणि रुपाली सावंत या शेतकरी दाम्पत्याने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

हे दाम्पत्य शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून निरंकार उपवास करत ८५ किलोमीटर अनवाणी पायाने चालत पंढरपूरला गेले होते. शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना स्टेजसमोर मला जवळ उभे करा, अशी विनंती संजय सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी तुमचा संपर्क क्रमांक द्या, मी तुम्हाला शपथविधी सोहळ्यात स्टेजवर उभे करतो, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले होते. सोशल मीडियावर या प्रसंगाची चांगलीच चर्चाही झाली होती.

महाविकासआघाडीने मंगळवारी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या इच्छेप्रमाणे मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी २८ तारखेला शिवतीर्थावर आयोजित करण्यात ठरले. त्यावेळी उद्धव यांनी संजय सावंत यांची आठवण ठेवून त्यांना अगत्याने निमंत्रण पाठवले. साहजिकच अनेकांकडून उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.

आतापर्यंत ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने राजकीय पद स्वीकारले नव्हते. त्यांच्याकडून केवळ रिमोट कंट्रोलने सत्तेची सूत्र हलवली जात असत. मात्र, आदित्य ठाकरे आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे घराणे पहिल्यांदाच प्रत्यक्ष राजकारणाच्या मैदानात उतरणार आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

1 Comments

  1. Sir we want to give you some news?? We can do it.... If yes pls tell me sir 9765196597

    ReplyDelete