अंधारातील पाप अंधारात नष्ट होईल.. अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांचा हल्लाबोल


Pandharpur Live Web-  अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. संपूर्ण महाराष्ट्रात साखरझोपेत असताना रातोरात राष्ट्रपती राजवट हटवली गेली. इतकंच काय तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही पार पडला.
या सर्व पार्श्वभूमीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांवर हल्लाबोल केला. अजित पवारांनी रात्रीत पाप केलं आहे.

ते नजरेला नजर मिळवत नव्हते. अंधारातील पाप अंधारात नष्ट होईल, शरद पवारांचा यामागे काही हात नाही हा माझा विश्वास आहे असं संजय राऊत म्हणाले.

अजित पवार काल रात्रीपर्यंत आमच्यासोबत होते. ते आमच्या नजरेला नजर देऊन बोलत नव्हते. ते लक्षात येत होतं, शरद पवार यांच्याही लक्षात आलं. त्यानंतर ते बाहेर पडले. त्यांचा फोन बंद झाला. ते वकिलाकडे बसल्याचं सांगण्यात आलं. ते कोणत्या वकिलाकडे बसले होते ते आज सकाळी कळालं. यामागे शरद पवार यांचा हात नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. शरद पवारांना ईडीची नोटीस आली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पवारांच्या मागे उभा राहिला. त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. त्यावेळी अजित पवारांनी राजीनामा दिला. त्याचवेळी आम्हाला संशय आला होता, असं संजय राऊत म्हणाले.

अजित पवार काल रात्रीपर्यंत आमच्यासोबत होते. मात्र ते बैठकीत आमच्या नजरेला नजर मिळवत नव्हते. त्यांची देहबोली संशयास्पद होती. ते आमच्या लक्षात येत होतं, शरद पवार यांच्याही लक्षात आलं. यामागे शरद पवार यांचा हात नाही हे मी ठामपणे सांगू शकतो. अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला.याला महाराष्ट्राची जनता उत्तर देईल.
फडणवीसांच्या सरकारच्या काळात अजित पवारांची जागा ऑर्थर रोड जेलमध्ये आहे हे वारंवार सांगण्यात आलं. आता यापुढील कॅबिनेटच्या बैठका ऑर्थर रोड जेलमध्ये होणार का?

अंधारात पाप होतं. चोरुन पार केलं जातं. याचा अर्थ यांनी चोरी केली, डाका टाकला. यांना याची किंमत मोजावी लागेल. मात्र, ज्याने शरद पवार यांना या वयात घरातूनच दगा देण्याचा प्रयत्न केला, त्याला जनता उत्तर देईल. पैसा आणि सत्तेचा गैरवापर करुन हे सर्व केलं. राज्याची जनता हे पाप ठोकारुन लावेल. डोळे उघडण्याआधी हे पाप नष्ट होईल.
अजित पवार यांची काय प्रतिक्रिया आहे हे माहिती नाही. भाजपने राजभवनाचा ज्याप्रकारे गैरवापर केला ते लोकशाहीत शोभत नाही. त्यांनी या संस्थांचा सत्ता, पैसा यांचा उपयोग करुन फसवलं, असं संजय राऊत म्हणाले.

राज्यपाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून आले आहेत. ते संस्कारी आहेत असं वाटत होतं. मात्र, निराशा झाली. अजित पवार यांनी आणि त्यांच्यासोबत जे गेले त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाशी बेईमानी केली. अजित पवारांना राज्यात फिरुन देणार नाही.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111, 8149624977
_________________________________________________
(ADV.) *मुळव्याधीचा समुळ नाश* 
               *फक्त एका महिन्यात* 
 *नवजीवन* 
 *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर* )
मूळव्याध ही व्याधी माणसाची चांगलीच दमछाक करते . ही व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे. या व्याधीमुळे मनःस्वास्थ्य व शरीर स्वास्थ दोन्हीही बिघडतात. यावर ऑपरेशन करून घेणे हा ईलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही. कारण ऑपरेशन हा पचनसंस्था सुधारण्याचा उपाय नाही. झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे. त्यामुळे झाड आपोआप उत्तमरितीने बहरेल . पाने टवटवीत व हिरवीगार होतील. मित्रांनो *मुळांती पावडर* हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात 
♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 *♦पाच लाखाहून जास्त समाधानी* *पेशंट* 
*15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये* 
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
*मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एकाच महिन्यात* 
*घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा* 
 *9145449999/9145339999* 
                   *संपर्क* 
         *नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट* 
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड,* *अहमदनगर. 9145229999*
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments