महानायक अमिताभ बच्चन दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित


Pandharpur Live : 
चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानासाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अमिताभ बच्चन यांना गौरविण्यात आलं. या कार्यक्रमाला त्यांची पत्नी खासदार जया बच्चन आणि मुलगा अभिषेकही उपस्थित होता.

चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला प्रकृती बरी नसल्यानं अमिताभ बच्चन उपस्थित राहू शकले नाही. त्यामुळे हा पुरस्कार आज प्रदान करणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं होतं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन अमिताभ बच्चन यांना सन्मानित करण्यात आलं.

दरम्यान, मला पुरस्कारासाठी पात्र समजलं. त्याबद्दल भारत सरकार, माहिती प्रसारण मंत्रालय आणि निवड समितीचे आभार मानतो. आई वडिलांचे आशीर्वाद आणि भारतीय जनतेच्या निष्ठापूर्वक प्रेमामुळे काम करता आलं, असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे.

Delhi: Veteran actor Amitabh Bachchan receives Dadasaheb Phalke Award from President Ram Nath Kovind.
View image on TwitterView image on TwitterView image on Twitter
501 people are talking about this
चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान असलेला दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा महानायक अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला होता. केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती.

यावेळी बोलताना बच्चन म्हणाले, "मला पुरस्कारासाठी पात्र समजलं. त्याबद्दल भारत सरकार, माहिती प्रसारण मंत्रालय आणि निवड समितीचे आभार. आई वडिलांचे आशीर्वाद आणि भारतीय जनतेच्या निष्ठापूर्वक प्रेमामुळे काम करता आलं. सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. नम्रतेने हा पुरस्कार स्वीकारत आहे. ज्यावेळी पुरस्काराची घोषणा झाली. त्यावेळी माझ्या मनात एक शंका आली की, हा पुरस्कार कशाचे संकेत आहे. भरपूर काम केलं, आता घरी बसा असा संदेश द्यायचा आहे का? अशी शंका माझ्या मनात आली. पण, मला अजून भरपूर काम करायचं आहे," असं बच्चन यांनी सांगितलं.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments