पंढरपूर- जप्त वाळू साठ्याचा फेर लिलाव 24 डिसेंबर 2019 रोजी


Pandharpur Live : 

           पंढरपूर, :- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा फेर लिलाव मंगळवार दिनांक 24 डिसेंबर 2019 रोजी दुपारी 12.00 वाजता  तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे यांनी दिली आहे.
            पंढरपूर तालुक्यात महसूल प्रशासनाने अवैध वाळू साठे व वाळू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत सुमारे  40  ब्रास वाळू जप्त केली असून, हा वाळू  शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे वाळू साठा ठेवण्यात आला आहे. या  ठिकाणच्या वाळू साठ्याची किंमत सुमारे दोन  लाख 80 हजार  रुपये  इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी. तसेच लिलावात भाग घेण्यासाठी सोमवार  दिनांक 23 डिसेंबर 2019 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत  लेखी अर्ज तहसिल कार्यालय, पंढरपूर यांच्याकडे सादर करावेत असेही तहसिलदार वाघमारे यांनी सांगितले.
            लिलावातील सर्वोत्तम बोलीची रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाव्दारे जमा करावी.तसेच स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही तहसिलदार वाघमारे यांनी केले आहे. 


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

1 Comments