शेतकरी कर्जमाफी- नियमित कर्जदारांना मिळणार मागच्यावेळीपेक्षा दुप्पट लाभ


Pandharpur Live : 

मार्च 2015 नंतर उचल केलेल्या पीक कर्जाची 30 सप्टेंबर 2019 पर्यंतची रक्‍कम व व्याज सरकार भरणार आहे. तर सप्टेंबर 2019 पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्याला प्रत्येकी दोन लाखांची माफी जाहीर करण्यात आली. मात्र, नियमित कर्जदारांची नाराजी नको या हेतूने त्यांना मागील कर्जमाफीच्या तुलनेत आता दुप्पट (50 हजार रुपये) रक्‍कम दिली जाण्याची शक्‍यता आहे. राज्यातील 44 लाख 70 हजार नियमित कर्जदारांसाठी तब्बल 25 हजार कोटी रुपये द्यावे लागणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली.

👉राज्यातील एक कोटी 53 लाख शेतकऱ्यांपैकी एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांकडे बॅंकांची तब्बल एक लाख 35 हजार कोटींची येणेबाकी आहे.
👉सरकारने जाहीर केलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफीसाठी सुमारे 40 हजार कोटी रुपये लागणार आहेत. नियमित कर्जदारांसाठी सुमारे 25 हजार कोटी लागणार आहेत.
👉दरम्यान, मागील कर्जमाफीत दीड लाखांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना आता दोन लाख रुपये मिळणार का, दोन लाख रुपये देताना उर्वरित रकमेचे काय, दोन लाख रुपये व्याजात की मुद्दलातून कपात होणार, दोन लाखांची कर्जमाफी बड्या शेतकऱ्यांनाही राहणार का, दोन लाखांची माफी कोणत्या कर्जाला मिळणार (मध्यम की दीर्घ) याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
👉मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शासन निर्णय निघाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
राज्याची स्थिती
एकूण शेतकरी - 1.53 कोटी
येणेबाकीदार शेतकरी - 1.08 कोटी
एकूण येणेबाकी - 1 लाख 35 हजार कोटी
नियमित कर्जदार - 44.70 लाख
नव्या कर्जमाफीची अंदाजित रक्‍कम - 63 हजार कोटी



_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments