Pandharpur Live :
निर्भयावर अत्याचार केलेल्या नराधमांना फासावर लटकावण्यासाठी मी तयार आहे. यासाठी मला परवानगी द्या! अशी मागणी आंतरराष्ट्रीय नेमबाज वर्तिका सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे वर्तिका सिंह यांनी अमित शहा यांना अशी साद घातली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपी सध्या तिहार कारागृहात असून, या चौघांना एकत्र फाशी देण्याची तयारी केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.
निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेल्या चारही आरोपींना महिलेकरवी फासावर लटकवण्यात यावे. यासाठी मी तयार आहे. महिलेच्या हातून फाशी दिल्यामुळे संपूर्ण देशात एक वेगळा संदेश जाईल. एक महिला फाशीही देऊ शकते, ही बाब त्यातून अधोरेखित होईल, असे वर्तिका सिंह यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
Lucknow: International shooter Vartika Singh has written a letter in blood to Union Home Minister Amit Shah stating that the four men convicted in Nirbhaya gang-rape case should be executed by a woman. (14.12.19)
8:25 AM · Dec 15, 2019Twitter Web App
माझ्या मागणीला महिला कलाकार आणि महिला खासदारांनी पाठिंबा द्यावा. यामुळे समाजात सकारात्मक बदल होतील, अशी मला आशा आहे, असेही वर्तिका सिंह यांनी पत्रात नमूद केले आहे. दरम्यान, संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्या निर्भया प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यातूनच प्रशासनाकडून फाशीची तयारी करण्यात आली असून, अलीकडेच एका डमीमध्ये 100 किलो वाळू भरून डमीला फाशी देण्यात आली. डमीला एक तास लटकवून ठेवत त्याचा आढावाही घेण्यात आला.
तर दुसरीकडे, निर्भया हत्याकांडातील चारही आरोपींना फाशी देण्यासाठी तिहार तुरुंगात एकही जल्लाद नसल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशातील शिमला येथे राहणार्या रवी कुमार यांनी या आरोपींना फाशी देण्यासाठी जल्लाद बनण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. रवीने राष्ट्रपतींना पत्र लिहून तिहार तुरुंगात आपली जल्लाद म्हणून तात्पुरती नियुक्ती करावी, अशी विनंती केली आहे. महिन्याभरात या चारही आरोपींच्या फाशीची तारीख निश्चित होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

0 Comments