पंढरपूर Live : अहमदनगर- अहमदनगर जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातील गावगुंडाकडू दहशत पसरवून सर्वसामान्य जनतेकडून हप्ता वसुली सुरू केल्याचे गंभीर प्रकार दिसुन येत आहेत. यातुनच ग्रामीण भागात बांधकाम करणाऱ्या एका तरुण मजुराची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तालुक्यातील रांजणी येथे ही घटना घडली आहे. साहिल पठाण असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे. हप्ता न दिल्याच्या रागातून गावगुंडानी साहिल नामक तरूणाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याची हत्या केली. मयताच्या साहिल पठाण हा खोसपुरी येथील रहिवासी आहे.
मिळालेली माहिती अशी की, मुबारक पठाण यांनी पाथर्डी तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ घोडके यांच्या घराच्या बांधकामाचा ठेका घेतला होता. या कामावर दहा दिवसांपासून इरफान हसन पठाण, रसूल बेग, युनूस पठाण, साहिल पठाण हे मजुरीने बांधकाम करत होते.
_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबा. 8308838111, 8149624977, 7972287368
...........................................
मंगळवारी सकाळी बांधकामाची वाळू चाळण्यास सुरवात केली असता दुपारी 1 वाजता वाळू चालत असलेल्या ठिकाणी गावातील आरोपी बुट्ट्या पवार आणि साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपी आले. त्यांनी साहिल पठाण यास बाहेरील मजुरांना या गावात आम्हाला हप्ते द्यावे लागतात, असे सांगितले. त्यामुळे घराचे मालक घोडके यांच्या मध्यस्थीने आरोपींना समजावून सांगितले. तरीही त्यांनी रागाने साहिल यास खंडोबा मंदिर जवळच्या बोळीत नेले.
आरोपी बुट्ट्या पवार आणि साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपींनी साहिल पठाण यांच्या डोक्यात कानाजवळ कुऱ्हाडीने वार केला. यात साहिल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने पाथर्डी आणि नंतर नगर येथे खासगी रुग्णालयात हलवले. परंतु गंभीर दुखापत गंभीर असल्याने रक्तस्त्राव होवून साहिल याचा मृत्यू झाला. रात्री उशिरा आरोपी बुट्ट्या पवार आणि साहेबराव पवार तसेच इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी
♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
*यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

0 Comments