Pandharpur Live : भुवैकुंठ पंढरी नगरीत पोलिसांनी मोबाईल चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असुन 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून 55 महागडे मोबाईल हँडसेटसही जप्त केले आहेत. सदर आरोपींनी ज्यांना चोरीचे मोबाईल विकले आहेत त्या मोबाईल खरेदी करणारांनाही ताब्यात घेतले जाईल. अशी माहिती पोलीस उपअधिक्षक डॉ. सागर कवडे यांनी दिली.

 पंढरी नगरीत श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी सतत भाविकांची वर्दळ असते.  येथे आलेल्या भाविकांच्या मोबाईल वर मात्र चोरट्यांची नजर असते. याबाबत पोलिसांना संशय होता. अनेक भाविकांच्या मोबाईल चोरीच्या तक्रारीवर नजर टाकली असता पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना पंढरीत मोबाईल चोरांची गँगच असल्याचा संशय आला. त्यानुसार त्यांनी सापळा लावला व मोबाईल चोरट्यांचा पर्दाफाश केला. पोलीसांच्या या कामगिरीचे पंढरपूरकरांसह भाविकांमधून कौतुक होत आहे. 

शहरात यात्रा कालावधीत एकादशी, मंगळवार बाजार दिवशी अशा ठिकाणात तसेच पार्किंग जागा असलेल्या ठिकाणांतून विविध कंपन्यांचे किमती मोबाईची चोरी करण्याचे प्रकार वारंवार घडत होते. याबाबत पंढरपूर शहर पोलिस निरिक्षक दयानंद गावडे यांनी सखोल चौकशी करुन अशा प्रकारचे गुन्हे करणारांच्या मागावर पोलीस पथक नेमले. दरम्यान याबाबत शोधमोहीम व कसून तपास केले असता शहरातील गणेश क्षीरसागर, सूरज ससाणे आणि एक अल्पवयीन आरोपी अशा 3 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 55 मोबाईल मिळून आले. या मोबाईलची अंदाजे किमती 4 लाख 7 हजार 700 एवढी असल्याची माहिती पंढरपूर पोलिस उपविभागीय अधिक्षक डॉ. सागर कवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________