पोलीस स्टेशन व तहसिलपासून काही अंतरावरच मटका जुगाराचा सुळसुळाट




Pandharpur Live : 

बिलोली पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादाने 
शहरात मटका व जुगार चा सुळसुळाट!!
एसकुमार बिलोलीकर (नांदेड जिल्हा प्रतिनिधी) यांचेकडून

"आवो चोरो बांधो भारा.. आधा तुम्हारा.. आधा हमारा" याच धर्तीवर  नांदेड जिल्ह्यातील बिलोलीत  मटका व  जुगार च्या बुक्क्या पोलीस स्टेशन व तहसिलपासून एक  दोन किलोमीटरच्या अंतरावर चालू आहेत तरी पण पोलीस प्रशासन "तेरी भी चुप,मेरी भी चुप" याच धर्तीवर आहे.
 कर्नाटक तेलंगणा राज्यातील जुगार व मटका प्रेमी बिलोली शहराकडे  येत असल्यामुळे बिलोली शहराला "मटक्याचे  पर्यटनस्थळ" म्हणून ओळखले जाते की काय? अशी भिती सर्वसामान्य नागरिकांना वाटु लागली आहे.  माञ  पोलीस प्रशासन याकडे  दुर्लक्ष करीत असल्यामुळे  शाळेतील ये-जा करणारी मुलं, कॉलेजचा तरुण वर्ग, शेतकरी, शेतमजुर, कामगार, हमाल, पानटपरीवाले, रिक्षावाले या सर्वांचे घर संसार उध्वस्त होत आहेत.

 मिशीवर ताव मारून फिरणारे व  मीच नेता म्हणुन वावरणारे पांढरे बगळे या व्यवसायाकडे बगल देत असल्यामुळे बिलोली शहराला मटका व जुगाराची कीड  लागत आहे.

 निवेदने देऊन मटका बंद करण्याची मागणी करणा-या कार्यकर्त्यांवर पोसलेले गाव गुंड लोखंडी रॉड घेऊन मारायला अंगावर  येतात आणि धमकी देण्याचे काम करतात. अशाना पायबंद का घालत नाहीत? असा खडा सवाल स्वतःला 'हरिश्चंद्र' समजणारे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना बिलोलीतील  मुक नायकांचा आहे.  हा  चालु असलेला गोरख धंदा बंद करून उध्वस्त संसाराला न्याय देण्यासाठी ? मुक नायक जनतेला  खरेच न्याय मिळवून देतील काय ?
याकडे बिलोली तालुक्यातील नागरिकांचे  लक्ष  लागले आहे.

_________________________________________________
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे 
मोबा.  8308838111, 8149624977, 7972287368
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments