Pandharpur Live :
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात अनेक मोठे मोठे आंदोलन केले जात आहेत. जाळपोळ केली जात आहे मात्र याबाबतचा राग काढायचा असल्यास तो मोदींवर काढा, पुतळा जाळायचा असल्यास तो मोदींचा जाळा परंतु गरीबाची झोपडी आणि वाहने जाळू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. दिल्लीच्या राम लीला मैदानावर एका सभेमध्ये पंतप्रधान बोलत होते. असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी उपस्थित केला तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून काँग्रेस आणि विरोधकांचा मोदींनी यावेळी चांगलाच समाचार घेतला.
नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत विरोधक अफवा पसरवत आहेत
केंद्र सरकारकडून नागरिकत्व सुधारण कायदा (CAA) करणाऱ्या सर्व खासदारांचे यावेळी पंतप्रधानांनी आभार मानले. याबाबत काही लोक अफवा पसरवत आहेत, भावनांना भडकवत आहेत असा आरोप मोदींनी यावेळी विरोधकांवर केला.
दिल्लीच्या शेकडो कॉलिनींना अधिकृत केले त्यावेळी आम्ही तुम्हाला तुम्ही कोणत्या धर्माचे आहात ? कोणाला मतदान करता ? कोठून आलात ? असे प्रश्न विचारले नाही म्हणूनच इथे राहणाऱ्या हिंदू शीख , इसाई, मुसलमान नागरिकांना याचा फायदा मिळाला, असल्याचे सांगत हा कायदा नागरिकांच्या हितासाठी असल्याचे देखील यावेळी मोदींनी ठणकावून सांगितले.
मोदींना जितका विरोध करायचंय करा, मोदींचा पुतळा जाळायचंय जाळा परंतु देशातील गरीबाची झोपडी जाळू नका, देशातील वाहने जाळू नका जेवढा राग आहे सगळं मोदींवर काढा गरिबांवर काढू नका अशा प्रकारचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रामलीला मैदानावरून केले आहे. पोलिसांवर झालेल्या हिंसेबाबत देखील यावेळी पंतप्रधांनी भाष्य केले. आंदोलनादरम्यान पोलिसांना मारून तुम्हाला काय मिळणार ? असा सवाल देखील यावेळी नरेंद्र मोदींनी उपस्थित केला.
NRC बाबत कधीच चर्चा झाली नाही, विरोध झाला नव्हता यावेळी केवळ खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे मोदींनी सांगितले.
काही शहरी नक्षलवाद्यांकडून मुसलमानांना कैदेत ठेवले जाणार असल्याच्या अफवा देखील पसरवल्या जात असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. तसेच देशाच्या सुशिक्षित तरुणांनी एकदा NRC म्हणजे काय हे वाचून घ्यावे असे आवाहन यावेळी पंतप्रधानांनी केले. देशातील अनेक वर्षांपासून राहणाऱ्या मुसलमानांना NRC बाबत घाबरण्याचे कारण नसल्याचे देखील पंतप्रधानांनी सांगितले.
रामलीला मैदानावरून पंतप्रधानांनी राज्य सरकारवर देखील चांगलीच टीका केली. दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने पाणी प्रश्नाबाबत कधीच कोणतं भाष्य केलं नसल्याचे मोदींनी यावेळी सांगितले त्यामुळे आजही दिल्लीतील जनतेला पाणी मोठ्या प्रमाणावर विकत घ्यावे लागत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

0 Comments