मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याला डावललं... चर्चेतील एकाचाही समावेश नाही! कार्यकर्ते नाराज


Pandharpur Live : 
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्यातील एकाही नेत्याचा समावेश झाला नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील संबंधित नेत्यांच्या समर्थकांमधून नाराजीचा सुर उमटत आहे.

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार म्हणजेच  महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षातील सोलापूर जिल्ह्याच्या नेते मंडळींना डावलण्यात आल्याचं दिसुन आलं. महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांचे सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्ते 'आपल्या नेत्याला मंत्री मंडळात स्थान मिळेल' या अपेक्षेने मंत्रीमंडळाच्या विस्ताराची वाट पहात होते. परंतु आज या सर्वच कार्यकर्त्यांची घोर निराशा झाल्याचे आढळते. 

गेल्या दोन दिवसात सुरू असलेल्या चर्चेत काँग्रेसच्या कोट्यातून शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून माढ्याचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे, पंढरपूर चे आमदार भारत भालके, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे आणि शिवसेनेच्या कोट्यातून परांड्याचे आमदार तानाजी सावंत यांचा मंत्रीमंडळात समावेश होईल. अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु यातील एकाही नेत्याची वर्णी मंत्रीपदावर न लागल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments