Pandharpur Live :
जनतेचा विश्वास गमावल्यानेच आता हे विरोधात बसले आहेत. विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी सरकारचे म्हणने ऐकून घेण्याऐवजी केवळ गोंधळ घालत आहेत.
विरोधक आज करीत असलेली मागणी हास्यास्पद आहे. अवकाळी पाऊस झाला तेंव्हा राज्यात तुमचेच सरकार होते. तेव्हा मदत द्यायला तुमचे हात कुणी धरले होते. आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांविषयीचा भाजपचा पुळका किती नाटकी आहे, हे शेतकऱ्यांना कळल्यानेच त्यांनी तुम्हाला विरोधी पक्षात बसविले आहे. असा टोला विधानसभेत गोंधळ घालणा-या विरोधकांना अर्थमंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.
केंद्राकडे 14,600 कोटींची मागणी
राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने सहा हजार सहाशे कोटी रुपये मंजूर केले असून, यापैकी दोन हजार शंभर कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत करण्याचे आश्वासन
विधानसभेत दुसऱ्याही दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपयांची मदत करावी अशी मागणी करीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची मागणी विरोधी पक्षांनी केल्यानंतर त्याला उत्तर देताना अर्थमंत्री बोलत होते. वित्तमंत्री म्हणाले, राज्य सरकारमार्फत मदतीचे वाटप सुरू आहे. मंजूर केलेल्या सहा हजार 600 कोटी रुपयांपैकी दोन हजार शंभर कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित केले आहेत. उर्वरित रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे.
आतापर्यंत दोन हजार कोटींची मदत दिली
राज्य सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सात हजार 400 कोटी रुपये तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सात हजार 200 कोटी रुपये अशी एकूण 14 हजार 600 कोटी रुपयांची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यातील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही अर्थमंत्र्यांनी दिली.
'तुम्हाला घोषणांचे प्रशिक्षण देतो'
राज्यात पाच वर्षे महाविकास आघाडीची सत्ता राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला विधानसभेत भाजपला गोंधळ घालणासाठी पाच वर्षे संधी आहे. पण तुम्हाला घोषणा देण्याची सवय नसल्याने आमच्याकडे या तुम्हाला घोषणांचे प्रशिक्षण देतो असे म्हणून वित्तमंत्री जयंत पाटील यांनी विरोधीपक्षाला चिमटा काढला. अवकाळी आणि परतीच्या पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याच्या संदर्भात सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनासंदर्भात निवेदन देताना ते बोलत होते.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________
(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

0 Comments