पंढरपुरातील कलावंतांसाठी स्वेरीत एकदिवशीय कार्यशाळा संपन्न


Pandharpur Live : 
ग्रामीण भागातील कलावंतांना व्यासपीठ देण्याची गरजशास्त्रज्ञ डॉ.व्ही.के.सुरी
पंढरपुरातील कलावंतांसाठी स्वेरीत एकदिवशीय कार्यशाळा संपन्न
पंढरपूर- ‘कलावंतांनी आणि कारागीरांनी आपल्या अंगीकृत कलांमध्ये निपुण होत असताना आपल्या व्यवसायाशी सल्लग्नित इतर व्यवसायातील कलागुण देखील आत्मसात करावेत. यामुळे आपल्यातील कलांचा विकास होवून आणखी नवीन कलाकृतीचा उदय होत असतो. आपल्या निर्माण केलेल्या मालाची, वस्तूंची  गुणवत्ता सर्वदूर पोचविण्यासाठी ग्रामीण भागातील कलावंतांना व कारागिरांना वेळोवेळी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यामुळे विकासाला गती येईल.’ असे प्रतिपादन भाभा णुसंशोधन केंद्राचे जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ.व्ही.के.सुरी यांनी केले.
_________________________________________________


गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा इंजिनिरिंगमध्ये आज संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील कलावंतांसाठी आणि कारागीरांसाठी आयोजिलेल्या एक दिवसीय कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शास्त्रज्ञ डॉ.सुरी हे उपस्थितांना मार्गदर्शन करत होते. दीप प्रज्वलनानंतर प्राचार्य डॉ.एन. डी. मिसाळ यांनी या कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू सांगून यामध्ये कच्च्या मालापासून ते वस्तू पूर्ण करून विक्री करेपर्यंतच्या बाबी क्रमवार सांगितल्या. 

फोटो केमिकल मशीन साठी बनवण्यात लागणारा कच्चामाल आणि आवश्यक बाबींचा योग्य साठा करून संपूर्ण तयार वस्तूची अथवा मालाला योग्य बाजारपेठ कशी मिळवायची ? याबद्दलचा अनुभव सांगितला. या कार्यशाळेत लाकेच्या सहाय्याने चुडा तयार करणे, फोटो केमिकल मशीनच्या सहायाने तांबे, पितळ आदी धातू वापरून सुबक मूर्ती, प्लेट तयार करणे, त्याची आकर्षक फ्रेममध्ये बसविणे, की-चेन, लहान मुलींच्या कानात घालणारे दागिने, शोभेचे वस्तू अशा विविध वस्तू बनविण्यासाठी कार्यशाळेत प्रात्यक्षिकाद्वारे शिक्षण देण्यात आले. यावेळी कलावंतांनी देव देविकांचे सुबक कलाकृती, चुडा बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. यावेळी अनेक कलावंतांनी यासाठी आवश्यक माहिती जाणून घेतले. कलावंतांनी व प्राध्यापकांनी तयार केलेल्या वस्तूंची पाहणी करून डॉ. सुरी व प्राचार्य डॉ. मिसाळ यांनी योग्य मार्गदर्शन केले. यामध्ये इरफान सय्यद, प्रदिप वाघमारे, योगेश सावंत, अंबादास घोडके, प्रसाद घोडके, अक्षय घोडके या कारागीर व कलावंतांसह पंढरपूर तालुक्यातील जवळपास ५५ कलावंत या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरींगचे विभागप्रमुख प्रा. एस.व्ही.कुलकर्णी, प्रा.एस.एस. बागल, एम.व्ही. सातपुते, इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. सुत्रसंचालन प्रा. अजिंक्य देशमुख यांनी केले तर प्रा.शुभम गाडे यांनी आभार मानले.



पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क 
पंढरपूर Live वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
      उपसंपादक-विजयकुमार माणिकराव गायकवाड   
मोबा.  8308838111, 8149624977, 7083980165
...........................................


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही
♦ पहिल्या दिवसापासूनच फरक 
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी 
 ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये
एकवेळेस अवश्य वापरा आणि करा... 
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
 9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
 *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधावा.
8149624977

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 50 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

मुख्य कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977, 7972287368

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments