तारूगव्हाण च्या माजी सरपंच श्रीमती कुंताताई पौळ यांचे दुःखद निधन


Pandharpur Live : 
तारूगव्हाण (ता.पाथरी, जि.परभणी) येथील माजी सरपंच श्रीमती कुंताताई शिवाजीराव पौळ यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले.

त्यांच्यावर आज रात्री तारूगव्हाण येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात 2 मुलं, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

माणुसकी जपणारा एक दुवा आज निखळला...

माझं  मुळगाव तारूगव्हाण (ता.पाथरी, जि.परभणी) येथील माझ्या नात्यातील  श्रीमती कुंताबाई शिवाजीराव पौळ यांचं आज दुःखद निधन झालं.

आमच्या गावातील पाटलांच्या सुनबाई  कुंताताईंचा स्वभाव खुपच मनमिळाऊ होता. गावात त्यांना खूप मोठा मान होता. आमच्या गावातील सर्वात मोठी माडी (वाडा) त्यांच्या सास-यांची होती. गावात कुणाचंही शुभकार्ये, साखरपुडा वगैरे कार्यक्रम असला की तो यांच्याच माडीवर संपन्न व्हायचा. ताईंचं त्यावेळी एकत्र कुटुंब होतं.  घरात सतत पै-पाहुण्यांचा राबता असे. सगळ्यांचा पाहुणचार ताई कोणतीही कुरबुर न करता सतत हसतमुखाने करत असत. आम्ही गावातील लहान सवंगडी नेहमीच त्यांच्या माडीवर खेळायचो,  बागडायचो. पण आमच्या गोंधळामुळे त्या कधीच आम्हाला रागावलेल्या आठवत नाहीत.

देवावर नितांत श्रद्धा असलेल्या कुंताताईंनी स्वतःच्या कुटूंबाचा गाडा सांभाळताना गावातील अनेकांच्या संसारासाठी हातभार लावला. त्यांचे सासरे आश्रोबा पौळ पाटील व पती शिवाजीबापु पौळ पाटील यांना गावच्या पंचक्रोशीत मोठा मानमरातब होता. दोघांचाही स्वभाव दिलखुलास, अंगी दातृत्व होतं. शिवाजीबापुंनी तालुक्याच्या  राजकारणात मोठा नावलौकिक मिळविला, ताईंनीही त्यांच्या पाठोपाठ गावच्या राजकारणात यश मिळवलेलं. 

ग्रामपंचायतीच्या सरपंच, विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन, कृ.उ.बाजार समिती, पाथरी च्या सदस्य आदी राजकीय पदावर असताना ताईंनी आपली कारकिर्द उत्तमरित्या पार पाडली.  ताईंना एकूण 4 मुलं, सतीश, मुरली ही दोन मुलं व दोन मुली. असा त्यांचा सुरेख परिवार.

काही वर्षांपूर्वी शिवाजीबापुंचं आकस्मिक निधन झालं आणि पतीच्या जाण्याने ताई खचल्या... ताईंचं आणि बापुंचं पती-पत्नीचं नातं आदर्श होतं. कुंताताईंसाठी बापु हेच सर्वस्व होते. त्यांच्या जाण्याने त्यांना एकाकी वाटु लागलं. गावात मन रमेना म्हणून त्या आपल्या मुलाकडे पुण्यात राहण्यासाठी गेल्या होत्या. 

आज त्यांचं आकस्मिक निधन झाल्याचं समजलं.....
डोळे पाणावले अन् मन भूतकाळात शिरलं.....
मित्रांनो काही माणसं चंदनासारखी असतात... जाताना आपल्या आठवणींचा सुगंधीत दरवळ पाठीमागे सोडून जातात. त्यापैकी च एक आमच्या 'कुंताताई'.
माझ्या मुळ गावातील माणुसकी जपणारा हा दुवा आज निखळल्याचं अतिव दुःखं होत आहे.
॥भावपुर्ण श्रध्दांजली॥

इहलोकीचा मुक्काम संपवून स्वर्गलोकी गेलेल्या ताईंना चिरशांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातुन सावरण्यासाठी बळ मिळो. हीच श्रीविठ्ठल रखुमाई चरणी प्रार्थना.

- भगवान गणपतराव वानखेडे.
पंढरपूर 

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________



_________________________________________________
_________________________________________________


_________________________________________________

(ADV.) येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा.
8149624977, 7083980165

_________________________________________________



_________________________________________________


Post a Comment

0 Comments