Pandharpur Live web Team-
येत्या शुक्रवारपासून सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांचा संप आहे. आणि यामुळे पुढील तीन दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे.वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांनी शुक्रवार (३१ जानेवारी) आणि शनिवार (१ फेब्रुवारी) असे दोन दिवस संपाची हाक दिली आहे. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प होणार असला तरी बँक कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्याला जोडून रविवार आल्याने आठवडा अखेर सलग तीन दिवस बँकां बंद राहणार आहे. त्यामुळे तुमचे काही बँकेत काम असेल तर आज नाहीतर उद्या उरकून घ्या
१ फेब्रुवारी हा पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. मात्र 'बजेट'च्या दिवशी कर्मचारी संघटनांच्या संपामुळं आठवडाअखेर तीन दिवस बँकिंग सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. 'इंडियन बँक असोसिएशन'सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा फिस्कटल्याने युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे.
सरकाराने मागण्यांची दखल घेतली नाही तर मार्च मध्ये आणखी तीन दिवस संपाचा इशारा बँक कर्मचारी संघटनांनी दिला आहे.त्यासोबतच फेब्रुवारीत तब्बल ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ६ सार्वजनिक सुट्ट्या असून दुसरा आणि चौथा शनिवार-रविवार आणि १ फेब्रुवारीचा संपाचा दिवस असे ११ दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे.


0 Comments