पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे माजी ग्रामपंचायत सदस्याचा गोळया घालून खुन



पंढरपूर तालुक्यातील भाळवणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विश्वास बबन भागवत (वय 35) यांच्यावर अज्ञात लोकांनी गोळया घालून खुन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. . या गोळीबारात भागवत यांचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास भाळवणी गावातील जिल्हा परिषद शाळेत समोर घडली.


या गोळीबार प्रकरणाची समजलेली माहिती अशी की विश्वास बबन भागवत वय (३५) हे भाळवणी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य आहेत. त्यांचा ठेकेदारीचाही व्यवसाय आहे. आज दुपारी बाराच्या सुमारास भाळवणी गावातील जिल्हा परिषद शाळेसमोर ते काही लोकांच्या समवेत बसलेले असताना मोटारसायकलवरून दोन अज्ञात मारेकरी आले आणि त्यांनी जवळून विश्वास भागवत यांच्यावर गोळ्या झाडल्या.

या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या भागवत यांना उपचारासाठी तातडीने पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे जाहीर करण्यात आले. शेतीच्या या वादातून भागवत यांची हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये कैद झाले असून पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत भस्मे हे पुढील तपास करीत आहेत.

एक तरुण व शेतकरी वर्गातील विश्वास संपादन केलेले भागवत यांनी काही वर्षापूर्वी शेतीतून व व्यवसायातून प्रगती केली होती. परंतु त्यांच्या अशा धक्कादायक हत्येने सर्वत्र खळबळ उडाली. छातीमध्ये गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली असून तपासाची यंत्रणा गतिमान केली आहे. घटनेच्या ठिकाणी जिल्हा पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, पोलिस उपविभागीय अधिकारी सागर कवडे, पोलिस निरीक्षक दयानंद गावडे, पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी भेट देऊन पाहणी केली. बापू भागवत यांचा मृतदेह शिवविच्छेदन करण्यासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. 

Post a Comment

0 Comments