पंढरपूर (प्रतिनिधी): सलग दुस-यांदा 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवुन नेणा-या बाललैंगिक अत्याचारातील आरोपीस पंढरपूर तालुका पोलिसांनी गजाआड केले आहे.
यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण आवचर यांनी दिलेल्या माहितीनुसार खर्डी, ता. पंढरपूर येथील आरोपी सुरज शिवाजी चंदनशिवे (वय 21) याने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवुन नेले होते. मे 2019 च्या दरम्यान बाललैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी या आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्यावर बाललैंगिक अत्याचार कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता.
सदर आरोपी वरील गुन्हयात जामीनावर सुटलेला असतानाच पुन्हा ऑक्टोबर 2019 मध्ये त्याने त्याच अल्पवयीन मुलीला पुन्हा पळवुन नेले होते. सदर आरोपीस मुलीसह अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर पोलीस ठाणे हद्दीतून परवा ताब्यात घेतले असुन त्याच्यावर पुन्हा बाललैंगिक अत्याचार कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपीस ताब्यात घेण्यासाठी मुर्तीजापूर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण आवचर यांनी दिली आहे.

0 Comments