पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- पंढरपूर येथील नवीन बसस्थानक परिसरात घातक असलेले कुकरी (चाकु) हे शस्त्र घेवून वावरणा-या एकास शहर पोलिसांनी काल रात्री अटक केली आहे.
सदर आरोपीवर पंढरपूर शहर पोलीस ठाणेत भाग 5 गु.र.न.148/2020 आर्म अँक्ट कलम 4 ,25 म.पो.का.क.135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
पो.ना./1578 मच्छिंद्र मोहन राजगे नेमणूक- पंढरपूर शहर पोलीस ठाणे पंढरपूर जिल्हा सोलापूर यांनी फिर्याद नोंदवली आहे.
सोहेल अफजल बागवान वय 21 वर्षे रा.दाळे गल्ली पंढरपूर तालुका -पंढरपूर जिल्हा- सोलापूर हा दि.30/01/2020 रोजी रात्रौ. 23/10 वा.चे सुमारास नवीन एस.टी.स्टँड जवळ असलेल्या अभिषेक बिअर बार चे समोर पंढरपूर ता. पंढरपूर येथे
गुन्ह्यातील हत्यार- 500/ किंमतीचे कुकरी हे शस्त्र, त्यात एक 40 इंच लांबीचा त्यात 13 इंच अंगाचीच काळी मुठ असलेले पाते 27 इंच लांबीची समोरील बाजूस निमुळते वक्राकार आकाराचे एका बाजूने धार असलेले पाते असलेला स्टीलचा कुकरी (चाकू) जु.वा.किं.अं. घेवून माल व शरीराविषयी गुन्हे करण्याच्या उद्देशाने वावरत होता.
वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकूर यानी विनापरवाना बेकायदेशीर घातक शस्त्र कुकरी (चाकु) वरील वर्णनाचा व किंमतीचा आपले कब्जात बाळगलेल्या परिस्थितीत मिळून आले म्हणून सदर आरोपींवर दि. 31-01-2020 01/27 वा. गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास
पो.हे.काॅ/ 353 उबाळे हे करत आहेत.
0 Comments