पंढरपूर- ह.भ.प. जयवंत पिसाळ यांच्या खुन्याची खळबळजनक कबुली... बंडातात्या कराडकरांनाही संपवणार होतो!

Pandharpur Live : 
कराडकर मठाचे मठाधिपती ह.भ.प. जयवंत पिसाळ यांचा चाकूने सपासप वार करुन खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी बाजीराव कराडकर याला पोलिसांनी अटक केली आहे. बाजीराव याच्याकडे पोलिसांनी कलेल्या चौकशीत त्याने खळबळजनक कबुली दिली आहे. ह.भ.प. बंडातात्या कराडकर आणि ह.भ.प जयवंत पिसाळ या दोघांनी माझ्यावर खोटेनाटे आरोप करुन मठाधिपतीपदावरुन मला खाली खेचले. मठामध्ये कीर्तन करण्याची परवानगी देखील देत नव्हते. या अपमानाचा बदला म्हणून मी बंडातात्या अन जयवंतला संपवण्याचा निर्णय घेतला होता. पण बंडातात्यांनी एक दिवस अधीच पंढरपूर सोडल्याने ते माझ्या तावडीतून सुटले, मात्र, जयवंत एकटाच सापडला असा खळबळजनक खुलासा आरोपीने केला आहे.

वारकरी संप्रदाय आणि पालखी सोहळ्यात कराडकर दिंडीला मानाचे स्थान आहे. या मठाचे तत्कालीन मठाधिपती ह.भ.प. भगवान महाराज कराडकर हे 1958 ते 2009 पर्यंत मठाधिपती होते. त्यांच्या वैकुंठगमनानंतर ह.भ.प. भगवान जगताप उर्फ बाजीरावबुआ गुरुमारुतीबुआ कराडकर यांची मठाधिपती नियुक्ती करण्यात आली. कराडकर मठाचा मठाधिपती ब्रह्मचारी आणि वारकरी संप्रदायाची रुढी परंपरा जपणारा असावा असा दंडक आहे.

मठाधिपती झाल्यानंतर बाजीराव याने मठाधिपतीचे सर्व निर्बंध तोडून भ्रष्ट आचरण करु लागल्याने ज्येष्ठ मंडळी त्याच्यावर नाराज होते. त्याला खाली खेचून त्याच्या जागी जयवंत पिसाळ यांची मठाधिपती म्हणून नियुक्ती केली. या सगळ्या घडामोडीत बंडातात्या कराडकर यांची भूमिका माझ्या विरोधात होती असा आरोप बाजीराव याने पोलीस चौकशीत केला. बंडातात्या हे वारकरी संप्रदायातील मोठे प्रस्थ आहे. व्यसनमुक्ती आणि वारकरी प्रश्नांवर बंडातात्या नेहमी आक्रमक भूमिका मांडतात. त्यांच्या रोखठोक भूमिकेमुळे बाजीराव नाराज होता.

बाजीराव याने एका वारकरी सहकाऱ्याच्या डोक्यात वीणा मारली होती. त्यामुळे त्याला तीन महिन्याची कैद झाली होती. तुरुंगातून सुटल्यावर त्याने मठाधिपती करण्याचा हट्ट धरला होता. तसेच त्याने सदस्यांना धमक्या दिल्या. यामुळे कराड पोलिसांनी त्याला हद्दपार केले होते. या कारवाईमुळे तो चिडून होता. तो काटा काढण्यासाठी संधीची वाट पहात होता. सोमवारी पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने बंडातात्या कराडकर आणि जयवंत पिसाळ हे दोघेही पंढरपूर मुक्कामी येणार हे बाजीराव जाणून होता.

याच संधीचा फायदा घेण्यासाठी त्याने मठात किर्तन करण्याची परवानगी मागितली होती. मात्र, त्याला परवानगी नाकारल्याने जयवंत पिसाळ आणि बाजीराव यांच्यात वाद झाले. याच पार्श्वभूमीवर त्याने द्वादशीला दोघांचा काटा काढण्याचा प्लॅन केला होता. मात्र, द्वादशीच्या आधल्या रात्रीच बंडातात्या पंढरपूरमधून निघून गेले. मात्र, जयवंत पिसाळ हे दुपारी एकटे सापडल्याने त्यांच्याबरोबर वाद उकरुन काढले. एका खोलीत त्याने जयवंत पिसाळ यांच्यावर चाकूने सपासप वार केले. पोलिसांनी आरोपी बाजीरावला घटनास्थळावरून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments