Pandharpur Live :
पंढरपूर-(दि.04):- विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच व्यवहारीक ज्ञानात भर पडावी यासाठी शिशु विहार व आदर्श प्राथमिक विद्यालय पंढरपूर येथे बाल आनंद मेळावा व विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन संजय राठोड शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा साधना भोसले, संस्थेचे अध्यक्ष मा.आ. सुधाकरपंत परिचारक, जिल्हा परिषद सदस्या रजनीताई देशमुख, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, विस्तारअधिकारी बिभीषण रणदिवे,केंद्र प्रमुख रामचंद्र बोडरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संजय राठोड शिक्षणाधिकारी (प्राथ.) विद्यार्थ्याच्या गुणवत्ते बरोबर विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास तसेच विविध उपक्रमांत अग्रगण्य शाळा म्हणून आदर्श प्राथमिक विद्यालय नावारुपात आली आहे. कै.कुसूमताई आराध्ये यांनी या संस्थेची उभारणी नावाप्रमाणे आदर्श केली असून, विद्यार्थ्यांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयोग याचा उपयोग करावा अशा शब्दात मार्गदर्शन करुन मुख्याध्यापकांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
आदर्श प्राथमिक विद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात याचा येथील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक फायदा होत असल्याचे गटशिक्षणाधिकारी नाळे यांनी यावेळी सांगितले. क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या सारख्या स्त्रिया शिक्षणातून समाजात शैक्षणिक बदल घडवू शकतात त्याप्रमाणे प्रत्येक स्त्रीने शिक्षण घेवून समजापुढे आदर्श निर्माण करावा असे जिल्हा परिषदेच्या सदस्या रजनीताई देशमुख यांनी सांगितले
बाल आनंद मेळाव्यातील बाजारात विद्यार्थ्यांनी विविध भाजीपाला,फळे, खाद्य पदार्थ, खेळण्याचे साहित्य यांची दुकाने मांडली होती. पालकांनी व नागरीकांनी आनंद बाजारातून वस्तू मुलांकडून खरेदी करत त्यांचे कौतुक केले. तसेच मान्यवरांनी विज्ञान प्रदर्शनात भेट देवून प्रदर्शनात मांडलेल्या विविध प्रयोगाचे निरक्षण केले.
या मेळाव्यास शाळा व्यवस्थापन समितीचे सचिव सतिश पुरंदरे, जेष्ठ सदस्या प्रतिभाताई कुलकर्णी, सदस्या रेखा उंबरकर, सदस्य डॉ.अनिल जोशी, ज्ञानेश आराध्ये उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी मुख्याध्यापिका राजश्री घंटे, शिशुविराच्या मुख्याध्यापिका सौ.कोकणे, शिक्षिका सौ.कोळी, सौ.पंधे, सौ.कदम, सौ.गोरे, शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलान मैत्रेयी केसकर यांनी केले. यावेळी पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे.
*वैशिष्ट्ये*
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 9145449999/9145339999
*संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट- *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999

0 Comments