○ पंढरपूर सिंहगड मध्ये सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या जयंतीचे निमित्त डाॅ. संगीता पाटील यांचे व्याख्यान संपन्न
पंढरपूर: प्रतिनिधी
समाजातील प्रत्येक क्षेत्रात आज आपण सर्व महिला करिअर करीत आहे ते केवळ साविञीबाई फुले यांच्या मुळे.त्याकाळी साविञीबाई फुले यांना खुप ञास झाला तरी त्या मागे हटल्या नाहीत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या फुले दांपत्याचे कार्य आजही समाजाला खुप प्रेरणादायी आहे. समाजातील अनिष्ट रूढी परंपरा मोडीत काढून स्ञियासांठी खुप महान कार्य इतिहासातील महिलांनी केले आहे. त्यांच्यातील एक तरी गुण तुम्ही आत्मसात केला तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. जीवनात खुप संकट येत असतात. या संकटाचा सामना ज्या पद्धतीने सावित्रीबाई फुले, जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आदीसह इतिहासातील अनेक महिलांनी करून समाज्यापुढे आदर्श ठरल्या अगदी त्याप्रमाणे तुम्ही कोणती चुक न करता संकटाचा सामना करून, संघर्ष करून जीवनात यशस्वी व्हा. तन मन धन एकाग्र करून तुम्ही तुमचे करिअर केले पाहिजे, आपल्या कामावर, करिअर वर प्रेम करून यश संपादन करा. जीवनात मुलाखतीच्या प्रसंगाला ज्याप्रमाणे तुम्ही एकट्या सामोरे जाता अगदी त्याप्रमाणे आयुष्यातील प्रत्येक संकटाला तुम्ही एकटे सामोरे गेले पाहिजे. समाज बदलण्याची अपेक्षा करू नका, समाज नाही तर तुम्ही स्वतः बदलला पाहिजे असे मत डाॅ. संगीता पाटील यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात बोलताना व्यक्त केले.
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात सावित्रीबाई फुले गर्ल्स फोरम यांच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थिनी साठी *इतिहासातील महिलांचे योगदान आज ही प्रेरणादायी* या विषयांवर डाॅ. संगीता पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रमुख पाहुण्या डाॅ. संगीता पाटील, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. अंजली पिसे, प्रा. सुधा सुरवसे आदी मान्यवरांच्या हस्ते साविञीबाई फुले, जिजाऊ व सरस्वती प्रतिमा पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या दरम्यान महाविद्यालयाच्या वतीने डाॅ. संगीता पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ प्रा. सुधा सुरवसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
*फोटो ओळी: पंढरपूर सिंहगड मध्ये विद्यार्थिनीना मार्गदर्शन करताना डाॅ. संगीता पाटील समोर उपस्थित विद्यार्थिनी व महाविद्यालयातील कर्मचारी.*

0 Comments