○ १२० हुन अधिक विद्यार्थ्यांचा कार्यशाळेत सहभाग
पंढरपूर सिंहगड मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत सहभागी झालेले विद्यार्थी.
पंढरपूर: (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन मावेन सिलिकाॅन एकदिवशी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना छोटे-मोठे प्रकल्प तयार करण्यासाठी आवश्यक माहिती मिळणार आहे, जगातील नामांकित कंपन्या मध्ये नोकरी तसेच शासकीय नोकरीत मिळविण्याकरिता, व्हि.एल. एस.आय. डिझाईन व आर. टी.एल. डिझाईन युझिंग व्हेरीलाॅग एच. डी.एल. या विषयी विद्यार्थ्यांना महत्वाचे माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.
या कार्यशाळेमध्ये मावेन सिलिकाॅनचे सीईओ प्रा. पी. आर. शिवकुमार यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत १२० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असुन ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागाचे विभाग प्रमुख प्रा. सुधा सुरवसे, डाॅ. अल्ताफ मुलाणी, प्रा. अविनाश हराळे, प्रा. सिद्धेश्वर गंगोंडा आदी परिश्रम घेत आहेत.
0 Comments