पुण्यात खळबळ.... महापालिका मुकादमाच्या घरात सापडले मोठे घबाड! पैसे मोजण्यासाठी लागली 1 रात्र


पुणे- फुटपाथवरील नारळ विक्रेत्याकडून 500 ची लाच घेणाऱ्या त्या मुकादमाच्या घरी एसीबीने टाकलेल्या छाप्यात घबाड सापडले असून, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पूर्ण रात्र पथक नोटा मोजत बसले होते. सुनील रामप्रकाश शर्मा (वय 55) असे घरात घबाड सापडलेल्या मुकादमाचे नाव आहे.

शनिवारी मुकादमाने येरवडा भागातील एका नारळ विक्रेत्याकडे 1 हजार रुपयांची लाच मागितली होती. या करवाईत एसीबीने पालिकेचा मुकादम शर्मा आणि खासगी व्यक्ती गोपी उबाळे (32) यांना पकडण्यात आले होते. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनील शर्मा हे येरवडा क्षेत्रीय कार्यालयात मुकादम म्हणून नोकरीस आहेत.

तर उबाळे हा खासगी व्यक्ती असून तो बिगारी कामे करतो. नारळाच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी लाच घेतली होती. यानंतर एसीबीने शर्मा याच्या लोहगाव येथील घरावर छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोन्याचे दागिने मिळाले. यावेळी पथकाला रात्र जागून काढावी लागली.

याठिकाणी 36 लाख रुपयांची रोकड आणि 7 तोळ्यांचे दागिने मिळाले आहेत. दागिने आणि रोकड जप्तकरून ते येरवडा पोलीस ठाण्यात पहाटे जमा करण्यात आले आहेत. दरम्यान रोकड आणि दागिने मिळाल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका मुकादमाच्या घरी इतकी रोकड सापडल्याने पोलीसही आवाक् झाले आहेत.

Post a Comment

0 Comments