पंढरपूर नगरपरिषदेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त मा.नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष लतिका डोके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण समारंभ करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी गटनेते अनिल अभंगराव, पाणीपुरवठा समिती सभापती गुरुदास अभ्यंकर, बांधकाम समिती सभापती विक्रम शिरसट, स्वच्छता व वैद्यकीय आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, शिक्षण समिती सभापती रेणुका घोडके, नगरसेविका शकुंतला नडगिरे, सुप्रिया डांगे, श्वेता डोंबे, करुणा आंबरे, नगरसेवक सुजितकुमार सर्वगोड, डी.राज.सर्वगोड, मालोजी शेंबडे, आदित्य फत्तेपुरकर, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज घोडके, बसवेश्वर देवमारे, तसेच नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी ध्वजनी म्हणुन उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर यांनी काम पाहिले.

0 Comments