पंढरपूर तालुक्यातील खेडभाळवणी येथे विजेच्या धक्क्याने चिमुकलीचा मृत्यू... ग्रामपंचायत व महावितरणच्या गलथान कारभाराचा बळी


Pandharpur Live : 
ग्रामसेवकव व महावितरण अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

खेडभाळवनीत यल्लम्मा देवीच्या यात्रेदरम्यान *कु .सानिका संतोष जाधव (वय वर्षे 11) हिचा विजेच्या लोखंडी पोलचा शाॅक लागून  जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकामध्ये उपस्थित होत आहे,खेडभाळवणी या गावात आजही जवळ जवळ 10 ते 12 विजेचे  लोखंडी पोल आहेत; आणि त्या पोल ची देखभाल व दुरुस्ती करण्याचे काम ग्रामपंचायत व महावितरण विभागाकडे असते,परंतु महावितरण आणि ग्रामपंचायत च्या गलथान कारभारामुळे या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. यल्लम्मा देवीच्या यात्रेनिमित्त गावामध्ये पंचक्रोशीतील हजारो लोक देवीच्या श्रद्धेपोटी येतात, त्या मध्ये लेकी-बाळी; लहान मुले, आणि माहेराला येणाऱ्या मुलींची संख्या भरपूर असते, कु.सानिका ही खेडभळावणी गावातील सुनिल साळुंखे यांची भाची होती,तिचे मूळ गाव कौठाळी असून यात्रेसाठी ती आपल्या मामाच्या गावाला आली होती, काही दिवसांपूर्वी तीचे वडील संतोष जाधव यांचे दुर्दैवी निधन झाले होते आणि आज महावितरण आणि ग्रामपंचायत च्या गलथान कारभारामुळे तिला ही आपला हसता खेळता जीव गमवावा लागला.

 गावामध्ये एवढा मोठा कार्यक्रम असताना महावितरण आणि ग्रामपंचायत ने दिवाबत्ती, रस्ते आणि विजेचे लोखंडी खांब यांची देखभाल व दुरुस्ती का केली नाही हा एकच प्रश्न सर्वांसमोर आहे.
महावितरण ने जर वेळीच लक्ष दिले असते तर सानिका ला आपला जीव गमवावा लागला नसता.

आज एक सानिका गेली,या पूर्वीही महावितरण च्या अनागोंदी कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना आणि लहान बालकांना हकनाक आपला जीव गमवावा लागत आहे.


_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments