पंढरपूर दि. 25- लोकशाही प्रक्रियेमध्ये नवमतदारांचा सहभाग वाढावा. यासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपले नांव मतदार यादीत नोंदवावे तसेच लोकशाही प्रबळ व बळकट करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन तहसिलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.वैशाली वाघमारे यांनी केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त तहसिल कार्यालय पंढरपूर येथून मतदार नोंदणी व मतदानाबाबत काढण्यात आलेल्या जनजागृतीपर रॅलीच्या शुभारंभ तहसिलदार डॉ.वैशाली वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी तहसिल कार्यालयाचे राहुल शिंदे, श्रीमती वर्षाराणी आधटराव, श्रीमती जिया नाईक, उमेश भोसले आदी उपस्थित होते.
प्रारंभी तहसिल कार्यालय येथे उपस्थितांनी मतदानाबाबत शपथ घेतली, तसेच मतदार दिना निमित्त आयोजित निबंध, वकृत्व, रंगोळी व चित्रकला स्पर्धेत सहभागी विजेत्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.
रॅली तहसिल कार्यालय येथून आंबेडकर पुतळा, सावरकर चौक मार्गे शिवाजी चौकात पोहोचली. शिवाजी चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत स्वेरी इंजनिअरींग कॉलेज, उमा महाविद्यालय, विवेक वर्धनी विद्यालय, कवठेकर विद्यालय, आपटे विद्यालय तसेच मातोश्री सखुबाई विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी सहभागी झाले होते.
0 Comments