Pandharpur Live :
राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त अनेक दिग्गज तसेच राजकीय नेत्यांनी त्यांना विनम्र अभिवादन केलं. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून जिजाऊंना विनम्र अभिवादन केलं आहे.
जिजामाताच्या शिकवणीमुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महारांजासारखे राजे लाभले. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून स्वराज्यप्रेरीका राजमाता जिजाऊ यांना काल जयंतीदिनी विनम्र अभिवादन केलं.
एक उडाली ठिणगी
आणि लाख पेटल्या मशाली,
स्वराज्याच्या संकल्पाची
नवी पहाट आली...
स्वराज्यप्रेरीका राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!#जिजाऊ #जिजाऊ_जन्मोत्सव #जिजामाता
134 people are talking about this
थोर तुमचे कर्ज जिजाऊ, उपकार कधी न फिटणार.
चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार.
शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलीत करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा!#जिजाऊ_जयंती #जिजाऊ_जन्मोत्सव
132 people are talking about this
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून जिजाऊचे उपकार कधीही न फिटणारे असल्याचं म्हणत शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलीत करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा केला आहे.
छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती.शौर्य,नीती आणि धैर्य अशा गुणांचा वारसा त्यांनी महाराष्ट्राला दिला.जिजाऊंच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
70 people are talking about this
राष्ट्रवादी नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जिजाऊंच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं आहे. छत्रपती शिवरायांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांनी महाराष्ट्राला शौर्य, नीती आणि धैर्य अशा गुणांचा वारसा दिला. जिजाऊंच्या चरणी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, अशा शब्दात त्यांनी जिजाऊविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.








0 Comments