पंढरपूर तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवारी होणार

          पंढरपूर, दि. 29 :-  पंढरपूर तालुक्यातील  हद्दीत जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव शुक्रवार दिनांक 07 फेब्रुवारी  2020 रोजी दुपारी 12.00 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय,  पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली आहे.
               पंढरपूर  तालुक्यातील  महसूल प्रशासनाने वाळू साठ्यावर केलेल्या कारवाईत सुमारे  800 ब्रास वाळू साठा जप्त केला आहे.  हा वाळू  साठा शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे 250 ब्रास, तालुका पोलीस स्टेशन पंढरपूर येथे  500 ब्रास तसेच  करकंब पोलीस स्टेशन येथे 50 ब्रास असा एकूण 800 ब्रास जप्त वाळू साठा असून, या  ठिकाणच्या वाळू साठ्याची  किंमत  सुमारे  56  लाख रुपये  इतकी आहे. ज्या कोणास वाळू लिलावात भाग घ्यावावयाचा अशा व्यक्तींनी  संबधीत ठिकाणच्या वाळू साठ्याची पाहणी करावी असे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
  लिलावात भाग घेण्यासाठी इच्छुकांनी गुरुवार दिनांक 06 फेब्रुवारी 2020 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्याकडे सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत लेखी अर्ज सादर करावेत. आयकर भरत असल्याचा पुरावा , पॅन व आधार कार्ड आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्जाचे विनापरतावा शुल्क  दोन हजार रुपये रोखीने भरावेत तसेच एकूण सरासरी किंमतीच्या  25 टक्के रक्क्म रोखीने अथवा डीडीने भरावेत. लिलावातील  सर्वोत्तम बोलीची रक्कम सात दिवसाच्या आत शासकीय चलनाद्वारे शासकीय खजीन्यात जमा करावी. तसेच स्वत:कडील वाहनाव्दारे संबधीत ठिकाणावरुन वाळू घेवून जावी. लिलावात भाग घेण्या-या व्यक्तींनी नमुद ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी ढोले यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments