महाराष्ट्रात अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या... सोलापूरच्या जिल्हाधिकारीपदी मिलिंद शंभरकर

Pandharpur Live -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्वीच्या फडणवीस सरकारच्या कार्यकाळात नियुक्‍तीवर असलेल्या ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी बदल्या केल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर आत्ता अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

समाजकल्याण विभागाचे आयुक्‍त मिलिंद शंभरकर यांची सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्‍ती झाली आहे, तर सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची सहव्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत बदली करण्यात आली आहे.

नव्याने रुजू होत असलेले जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यापूर्वी समाजकल्याण आयुक्‍त म्हणून काम केले आहे. यापूर्वी त्यांनी अप्पर जिल्हाधिकारीपदासह शासनाच्या विविध विभागांत काम केले आहे. त्यांच्यावर आता सोलापूर जिल्हाधिकारी म्हणून
जबाबदारी देण्यात आली आहे.


राज्यातील महत्वाच्या बदल्या खालीलप्रमाणे 
(कंसात पूर्वीची जबाबदारी)

- राजीव जलोटा - अपर मुख्य सचिव ग्रामविकास - (आयुक्त विक्रीकर)
- संजीव कुमार - आयुक्त विक्रीकर महाराष्ट्र राज्य, मुंबई - (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण)
- शैला ए. - अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युतनिर्मिती कंपनी, मुंबई - (सहविक्रीकर आयुक्त)
- पी. वेलरासू - अतिरिक्त महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महापालिका- (सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण)
- असीमकुमार गुप्ता - प्रधान सचिव ऊर्जा - (प्रधान सचिव ग्रामविकास)
- श्वेता सिंघल - अतिरिक्त विभागीय आयुक्त, पुणे (जिल्हाधिकारी, सातारा)
- शेखर सिंग- सातारा जिल्हाधिकारी - (जिल्हाधिकारी गडचिरोली)
- मंजू लक्ष्मी - जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग - (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग)
- मिलिंद शंभरकर - नियुक्ती जिल्हाधिकारी, सोलापूर (आयुक्त, समाजकल्याण)
- आर. बी. भोसले - सहव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण (जिल्हाधिकारी, सोलापूर)
- नयना गुंडे - आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे - (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ)
- डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी- अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पुणे महानगर परिवहन महामंडळ, पुणे (जिल्हाधिकारी, रायगड)
- आर. एस. जगताप - अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर - (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, भंडारा)
- भुवनेश्वरी - मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, भंडारा - (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)
- मदन नागरगोजे - संचालक माहिती व तंत्रज्ञान मुंबई



Post a Comment

0 Comments