धक्कादायक- शेतातल्या मुंजोबा देवाची पुजा केली अन् देवाचे गाणे मोबाईलवर ऐकत 'त्याने' घेतला गळफास!

पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- 
पिंपरी : शेतातील मुुंजोबा देवाची पुजा करून तसेच देवाची गाणी मोबाईलवर लावून ती ऐकत एकाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना मोशी येथे गुरुवारी (दि. 30) रोजी सकाळी घडलीय. संदीप चिनकु आल्हाट (वय 43, रा. जुना आळंदी रोड, आल्हाट वस्ती, मोशी) असे गळफास घेतलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.

मयत संदीप यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हे सकाळी आठ वाजताच्या सुमारास घरातून शेतात जाण्यासाठी निघाले. शेतात जाऊन त्यांनी मुंजोबा देवाची पुजा केली.

त्यानंतर मोबाईलवर देवाची गाणी लावत जवळच असलेल्या झाडाला गळफास घेतला. सकाळी दहा वाजताच्या सुमारास संदीप यांचा भाऊ शेतात गेला असता हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मयत संदीप यांच्या मागे आई, वडिल, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments