केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पंढरपूर शहर व तालुक्‍यात ठिकठिकाणी आंदोलने

Pandharpur Live : केंद्र सरकारच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ काल पंढरपूर शहर व तालुक्‍यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. काल झालेल्या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह विविध कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. पंढरपूर येथील तहसिल कार्यालयासमोर पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला तालुक्‍यातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी ठिय्या आंदोलन केले. कालच्या बंदमध्ये शासकीय कर्मचारीही सहभागी झाल्याने शासकीय कामकाजावर परिणाम झाला.

स्वाभिमानी शेतकरी  संघटनेच्या वतीने तुंगत आणि भंडीशेगाव (ता. पंढरपूर) येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आज सकाळी तुंगत येथे पंढरपूर-मोहोळ राज्य मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्तारोको आंदोलन केले. यावेळी संघटनेचे विजय रणदिवे, तानाजी बागल, सचिन पाटील यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणा विरोधात आणि राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या धोरणावर टीका केली. सुमारे तासभर चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक विस्कळित झाली होती. पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

भंडीशेगाव येथे ही दुपारी पंढरपूर-पुणे महामार्गावर स्विीामानीच्या वतीने रास्तारोको करण्यात आला. येथील आंदोलनामध्ये भंडीशेगाव व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारने शेती मालाच्या आयात आणि निर्याती संबंधी घेतलेल्या निर्णयाचा फेर विचार करावा अशी मागणी नवनाथ माने यांनी केली.
_________________________________________________
(ADV.) मुळव्याधीचा समुळ नाश...फक्त एका महिन्यात
 नवजीवन लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
मुळांती पावडर हे बहुगुणी वनस्पती चे मिश्रण आहे. आपली पचनशक्ती सुधारण्यास मदत करते. रक्त,आग,खाज, कोंब, पोट साफ होणे या वर अतिशय गुणकारी आहे. 
*वैशिष्ट्ये* 
♦अगदी माफक दरात ♦कोणताही दुष्परिणाम नाही ♦ पहिल्या दिवसापासूनच फरक
♦फरक न जाणवल्यास 💯% मनीबॅक गॅरंटी  ♦पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट
15 दिवसांचा कोर्स फक्त रु. 999/- मध्ये एकवेळेस अवश्य वापरा आणि करा...
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा  9145449999/9145339999
                   *संपर्क : नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट-  *यशोदा नगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर. 9145229999
_________________________________________________







Post a Comment

0 Comments