पुण्यातील सुप्रसिद्ध येवले चहा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) अहवालात येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे.
एफडीएने येवले फूड प्रॉडक्टची तपासणी केली असता चहामध्ये रंग टाकण्यात येत असल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत रंगाचा वापर करणे चुकीचे आहे.
दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एफडीएने कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे तपासणी करत चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन जप्त केला आहे. तसेच, अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. चहा पावडर बनवण्यासाठी मेलानाईटचा वापर केला जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती.
तपासनीस पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार होती. येवले चहाचे कोंढव्यातील उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) कडून देण्यात आले होते. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पॅकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन केल्याने पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश एफडीएचे सहआयुक्त एस. एस. देशमुख यांनी दिले होते. तसेच येवले कडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरातीतील येवले चहा प्यायल्यावर पित्त होत नाही, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते हे दावे खोटे असल्याचे एफडीएने म्हटले होते.
येवले चहाच्या वतीने चहा पावडरची गुणवत्ता खातरजमा होण्यासाठी आरोग्य प्रयोगशाळेकडून तपासणी केलेली नाही. तसेच गोदामात पेस्ट कंट्रोल केले नसल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे तसेच अन्नपदार्थ पॅकिंग करण्यासाठी उपयोगात आणले जाणारे असे कोणतेही पॅकिंगचा पुरावा नव्हता. या संदर्भात हे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले होते. येवले फूड प्रॉडक्टचे उत्पादित पदार्थांची विक्री अन्वी डिस्ट्रीब्युटर्स यांच्यामार्फत करण्यात येते. त्या वितरकाकडे एफडीएचा परवाना नसल्याचे आढळून आले नव्हते. त्यामुळे ही कारवाई केल्याचे प्रशासनाने सांगितले आहे होते.


0 Comments