महत्वाचे - जाणुन घ्या 'कोरोना' विषाणूबाबत... वेळीच उपचाराने प्रतिबंध शक्य: डॉ.ढेले

पंढरपूर लाईव्ह-

पंढरपूर, दि. 01 :-  चीनमधील वुहान प्रांतातून कोरोना विषाणूचा संसर्ग होत आहे,  मात्र याबाबत घाबरुन न जाता वेळेत उपचार करुन, संसर्गास प्रतिबंध करता येतो, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदिप ढेले यांनी आज सांगितले.
खोकला, ताप आणि श्वसनास अडथळा निर्माण होणे ही करोना विषाणू संसर्गाची मुख्य लक्षणे ही लक्षणे आढळल्यास स्वता: उपचार करु नये डॉक्टरांचा सल्ला घ्यावा त्यानुसार उपचार सुरु करावे असे आवाहन डॉ.प्रदिप ढेले यांनी केले आहे.
कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी हे करा :-
साबण पाण्याने हात स्वच्छ धुवा,
शिंकताना, खोकताना नाकावर, तोंडावर रुमाला धरावा.
सर्दी, फ्लू सदृश्य लक्षणे असलेल्या लोकांशी संपर्क टाळा.
मांस, अंडी पूर्णपणे शिजवून, उकडून घ्या.
जंगली अथवा पाळीव प्राण्याशी निकटचा संपर्क टाळा.
सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका.
संसर्गाची लक्षणे आढळल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा.
संपर्क साधण्यासाठी :-
कस्तुरबा रुग्णालय, मुंबई (022-23027769)
नायडू रुग्णालय, पंणे (020-25506300)
राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक- +91-11-23978046
राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक- 020-26127394
टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक- 104

Post a Comment

0 Comments