
कोल्हापूर,सांगली,मिरज,सांगोला मार्गे येणारी वाहने बिडारी बंगला किंवा कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येवून टाकळी हायस्कुल व वेअर हाउस येथे पार्क करावीत. तसेच विजापूर, मंगळवेढा मार्गे येणारी वाहने कासेगांव, कासेगांव फाटा मार्गे येवून यमाई तुकाई मंदीर किंवा बिडारी बंगला येथे पार्क करावीत. अथवा सदर वाहने कासेगांव फाटा, टाकळी बायपास मार्गे येवून टाकळी हायस्कुल व वेअर हाउस येथे पार्क करावीत. पंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांबाबत सूचना:-पंढरपूर शहरातून टेंभुर्णी, नगर, सोलापूर, लातूरकडे जाणा-या सर्व वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका,कॉलेज क्रॉस रोड,करकंब चौक मार्गे जातील.पुणे-साता-याकडे जाणारी वाहने सावरकर चौक, नवीन कराड नाका, कॉलेज क्रॉस रोड, वाखरी मार्गे जातील तर विजापूर, कराड, आटपाडी, कोल्हापूर, सांगली, मिरज, मंगळवेढा मार्गे जाणा-या सर्व गाड्या सावरकर चौक, नवीन कराड नाका, गादेगांव फाट्या पासून जातील.
पंढरपूर शहरातीलअंतर्गत वाहतुकीबाबत:- 01 ते 09 फेब्रुवारी पर्यंत प्रदक्षिणा मार्ग,महाव्दार चौक ते शिवाजी चौक,सावरकर चौक ते शिवाजी चौक मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असेल. बार्शी, सोलापूर मार्गावरुन येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगणापर्यत जातील. नियमित येणारे ट्रक व यात्रेसाठी सोडण्यात येणा-या एस.टी. बसेसना जुना दगडी पुल व तीन रस्ता मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंगळवेढा नाका, महात्मा फुले चौक या मार्गाने येणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी आहे.अंबाबाई पटांगण ते भजनदास चौक, अंबाबाई पटांगण ते अर्बन बँक, सावरकर चौक ते अर्बन बँक,भक्ती मार्ग ते काळा मारुती चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनासांठी बंद ठेवण्यात येणार आहे.
पार्किंग व्यवस्था सूचना :-नगर, बार्शी, सोलापूर, मोहोळ कडून येणारी वाहने करकंब क्रॉस रोड तीन रस्ता मार्गे विसावा येथे पार्किग करतील. पुणे, सातारा, वाखरी, मार्गे येणारी वाहने कॉलेज क्रॉस चौकीच्या पाठीमागील मैदानात व कॉलेजच्या पाठीमागील लिंक रोड जवळच्या मैदानात पार्क करावीत. कराड, आटपाडी, दिघंची मार्गे येणारी वाहने वेअर हाऊस येथे पार्क करावीत. कोल्हापूर, सांगली, मिरज, सांगोला मार्गे येणारी वाहने कासेगांव फाटा, टाकळी मार्गे येवून टाकळी हायस्कुल व वेअर हाउस किंवा बिडारी बंगला येथे पार्क करावीत. विजापूर, मंगळवेढाकडून येणारी वाहने अनवली फाटा, कासेगाव, कासेगाव फाटा, टाकळी मार्गे वेअर हाऊस येथे पार्क करावीत. यात्रा कालावधीत शहरात येणारी हलकी वाहने अंबाबाई पटांगण तसेच संबधीत मठामध्ये पार्क होतील इतर वाहने जुन्या कराड नाक्यासमोरील रेल्वे मैदान व मार्केट यार्ड येथे पार्क करतील. शहरातील अंतर्गत रोडवर कोणत्याही ठिकाणी गाड्या पार्क करण्यास मनाई असेल.
एकेरी मार्ग:- कॉलेज क्रॉस रोड ते सरगम चौक ते सावरकर चौक ते नवीन कराड नाका यामार्गावर एकेरी वाहतुक राहील.
शहराबाहेरुन जाणाऱ्या वाहतुकीबाबत सूचना:- सोलापूर, बार्शी, नगर बाजुकडून नियमीतपणे पंढरपूर मार्गे बाह्यवळण मार्गावरुन वेळापूर, अकलूज, महुद, सांगोला, मंगळवेढा कडे जाणारी जड व अवजड वाहनांना मोहोळ शिवाजी चौक, शेटफळ फाटा, अहिल्या चौक येथून पंढरपूर मार्गे जाण्यास प्रवेश बंदी आहे. ही वाहने मोहोळ, कामती, मंगळवेढा, सांगोला किंवा शेटफळ, टेभुर्णी, वेळापूर, साळमुख फाटा, महुद, सांगोला मार्गे या पर्यायी मार्गे इच्छित स्थळी जातील.

0 Comments